मांजरा नदीवरील साई बॅरेजमध्ये पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:47+5:302021-05-17T04:17:47+5:30

मांजरा नदीवर लातूर तालुक्यात साई बॅरेज आहे. गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा शेतीतून अधिक उत्पादन काढण्यासाठी बॅरेज परिसरातील ...

Demand for release of water in Sai Barrage on Manjara river | मांजरा नदीवरील साई बॅरेजमध्ये पाणी सोडण्याची मागणी

मांजरा नदीवरील साई बॅरेजमध्ये पाणी सोडण्याची मागणी

Next

मांजरा नदीवर लातूर तालुक्यात साई बॅरेज आहे. गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा शेतीतून अधिक उत्पादन काढण्यासाठी बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस, फळबागा तसेच भाजीपाल्याची लागवड केली आहे. सध्या मे महिना असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठे कोरडे पडत आहेत. परिणामी, बॅरेजमधील पाण्याने तळ गाठला आहे. या बॅरेज परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टीपोटीची रक्कम भरणा केली आहे. परंतु, पाटबंधारे विभागाकडून बॅरेजमध्ये पाणी सोडण्यात येत नाही. परिणामी, उसासह फळबागा, भाजीपाला वाळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उपलब्ध करून दिले जात नसल्याने युवा सेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी पाटबंधारे विभागास पाणी सोडण्याची मागणी करीत निवेदन दिले आहे. त्यावर तसेच अशोक पवार, ज्ञानेश्वर पवार, मनोहर पवार, संजय जगताप, हरिकिशन पवार, बळीराम पांडे, श्रीमंत पवार, गुरुनाथ स्वामी, काशिनाथ स्वामी, वसंत मिटकरी, शिवाजी मिटकरी, रामराव पवार, शामराव पवार, जीवन सूर्यवंशी, बाळू स्वामी, विष्णू पवार यांनीही निवेदन देऊन पाणी मागणी सोडण्याची मागणी केली आहे.

Web Title: Demand for release of water in Sai Barrage on Manjara river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.