देवणी तालुक्यातील १७ गावांतील ४९ ग्रामपंचायत उमेदवारांची अनामत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:24 AM2021-02-25T04:24:09+5:302021-02-25T04:24:09+5:30
नुकत्याच झालेल्या ३३ गावांतील २१२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी तब्बल ५१५ उमेदवार निवडणूक रिंगणात हाेते. निवडणुकीनंतर ३३ गावांपैकी १७ गावांतील सर्वसाधारण ...
नुकत्याच झालेल्या ३३ गावांतील २१२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी तब्बल ५१५ उमेदवार निवडणूक रिंगणात हाेते. निवडणुकीनंतर ३३ गावांपैकी १७ गावांतील सर्वसाधारण आणि राखीव संवर्गातील स्त्री आणि पुरुष उमेदवार मिळून ४९ उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवता आले नाही. डिपॉझिट जप्त झालेली एकूण रक्कम १३ हजार ७०० रुपये एवढी आहे.
गावनिहाय डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची संख्या आणि रक्कम खालीलप्रमाणे आहे. कवठाळा येथील सात उमेदवारांची रक्कम २ हजार ३०० रुपये, धनेगाव चार उमेदवार रुपये २ हजार, जवळगा येथील सहा उमेदवारांचे १ हजार ४०० रुपये, लासोना येथील पाच उमेदवारांची अनामत रक्कम १ हजार ३०० रुपये, नागराळ येथील तीन उमेदवारांची रक्कम १ हजार १०० रुपये, सिंधीकामट येथील दोन उमेदवारांची १ हजार रुपये, हंचनाळच्या पाच उमेदवारांची ९०० रुपये तर देवणी खुर्द येथील तीन उमेदवारांची ३०० रुपये, काेनाळी येथील दोन उमेदवारांची २०० रुपये, तळेगाव येथील एक उमेदवार ५०० रुपये, वलांडी येथील दोन उमेदवार ६०० रुपये, गुरणाळ येथील एक उमेदवार १०० रुपये, सावरगाव येथील तीन उमेदवारांची ३०० रुपये, विळेगाव येथील एका उमेदवाराची १०० रुपये, नेकनाळ येथील एक उमेदवार १०० रुपये, गुरदाळ येथील एका उमेदवारांची ५०० रुपये तर अचवला येथील दोन उमेदवारांची १ हजार रुपये अनामत रक्कम जप्त झाली आहे.