वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:42 AM2021-09-02T04:42:49+5:302021-09-02T04:42:49+5:30

... उदगिरी महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ...

Deprived Bahujan Alliance Review Meeting | वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक

वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक

Next

...

उदगिरी महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, प्रा. आर. एन. जाधव, प्रा. सी. एम. भद्रे, डॉ. गौरव जेवळीकर, क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंडे, रोहन ऐनाडले, महेश बिलापट्टे आदी उपस्थित होते. यावेळी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी प्राचार्य आर.आर. तांबोळी म्हणाले, खेळ हा प्रत्येकास सकारात्मक विचार करण्यास शिकवितो. तसेच प्रेरणा देण्याचे कार्य करतो.

...

शिवनेरीत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

शिरुर अनंतपाळ : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून सोमवारी येथील शिवनेरी महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. ओमप्रकाश जाधव, प्रा. बालाजी हालसे, डॉ. डी.के. धुमाळे, प्रा. मारोती गायकवाड, डॉ. विनोद मुक्के, प्रा. सतीश माने, डॉ. हणमंत वागलगावे, डॉ. अमोल लाटे, प्रा. गोरोबा रोडगे आदी उपस्थित होते.

...

जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे साकडे

जळकोट : पावसाच्या उघडिपीमुळे तालुक्यातील अतनूरसह परिसरातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानीचे सूचना फॉर्म भरून घेण्यास नकार देत ऑनलाईन करण्यास सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी ॲड. बी. एम. सासट्टे, शिवसेनेचे विकास सोमुसे, मुक्तेश्वर येवरे, ज्ञानेश्वर जाधव, शिवराज रेड्डी, तानाजी सोमुसे, विजय चव्हाण, बी.जी. शिंदे, चौहाण, माधव बाबर, गोपाळ कोडगिरे, बाबू पंचगल्ले, ईश्वर अतनूरकर, शहाजी पाटील, जे. जी. शिंदे, माधवसिंह चौहाण, उपसरपंच बाबू कापसे, अनिल पत्तेवार आदी उपस्थित होते.

Web Title: Deprived Bahujan Alliance Review Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.