शेतमाल विक्रीसाठी स्वत:चा ब्रँड विकसित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:17 AM2021-01-14T04:17:04+5:302021-01-14T04:17:04+5:30
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मामार्फत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथील उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त ...
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मामार्फत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथील उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त माधवराव भुजंगराव चव्हाण यांनी ‘शेतकरी ते ग्राहका’अंतर्गत ‘अण्णांच्या गावाचं टरबूज’ या ब्रँडखाली विविध फळे आणि भाजीपाला विक्री स्टाॅल सुरू केला आहे. या स्टाॅलचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्या हस्ते झाले. यावेळी आत्माचे उपसंचालक आर. एस. पाटील, रेणापूर तालुका कृषी अधिकारी हरिनाम नागरगोजे, आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक रणजीत चव्हाण, कृषी पर्यवेक्षक अंगद सुडे, वैभव चव्हाण, गणपतराव चव्हाण, प्रशांत सरवदे, निशांत देशमुख, महेश पाटील, त्र्यंबक स्वामी, सचिन पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यशवंतवाडी येथील प्रगत शेतकरी माधवराव चव्हाण यांच्या शेतामध्ये भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो, सिमला मिरची, अद्रक, काकडी, मिरची, फळांमध्ये आंबा, सीताफळ तसेच टरबूज लागवड करण्यात आली आहे. त्याची विक्री लातूर शहरात केली जात आहे.