विकास कामांतून चाकूरचा चेहरा- मोहरा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:34+5:302021-09-04T04:24:34+5:30
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बोथी मार्गावर ४ कोटी ७१ लक्ष खर्चून साडेचार किमी अंतराच्या रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते ...
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बोथी मार्गावर ४ कोटी ७१ लक्ष खर्चून साडेचार किमी अंतराच्या रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष करीमसाहेब गुळवे होते. यावेळी कार्यकारी अभियंता एम.एम. पटेल, पंचायत समितीचे माजी उपसभापती पद्माकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन करीमसाहेब डोंगरे, डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. सी.टी. कांबळे, शकुंतला शेवाळे, बालाजी सूर्यवंशी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे, माजी तालुकाप्रमुख अंगद पवार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राहुल सुरवसे, अनिल वाडकर, सिध्देश्वर अंकलकोटे, शहराध्यक्ष गणेश फुलारी, हुसेन शेख, नागोराव पाटील, नगरसेवक इलियास सय्यद, ॲड. संतोष गंभीरे, यशवंत जाधव, तुकाराम जाधव, गणपत कवठे, विष्णू तिकटे, भागवत फुले, बाळू जाधव, गंगाधर अक्कानवरु आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक कार्यकारी अभियंता एम.एम. पटेल, सूत्रसंचालन युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण यांनी केले. आभार माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव, ॲड. धनराज सूर्यवंशी, नागनाथ येरनाळे, गणेश सिंदाळकर, शैलेश कदम, मदन रामासाने, संदीप शेटे, सिध्दाजी माने, महेंद्र आचार्य, चंद्रमणी सिरसाठ, सचिन तोरे, नागनाथ यरनाळे, जाफर सय्यद, मतीन गुळवे, मुज्जमिल सय्यद, नागेश बेरुळे, अजित सौदागर, नागेश जाधव आदी उपस्थित होते. डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. सी.टी. कांबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला.
कामे दर्जेदार करावीत...
आ. बाबासाहेब पाटील म्हणाले, सर्वसामान्यांना केंद्रस्थानी मानून विकास कामे सुरु आहेत. नगरपंचायती अंतर्गतच्या कामांसाठी नगरविकास खात्याकडून भरीव निधी देण्याचे काम केले. त्यामुळे शहरातील विविध भागात अंतर्गत कामे सुरू झाली आहेत. शहरातील विकास कामांचा अनुशेष भरुन काढला जाईल. या रस्त्याच्या कामामुळे वेळ व इंधनाची बचत होणार आहे. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. कामे दर्जेदार व्हावीत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामावर प्रत्यक्ष राहून कामे करून घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
या साडेचार किमीच्या रस्त्याचे रुंदीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण, दुभाजकासह डांबरीकरण होणार आहे. चार महिन्यांत काम पूर्ण करावयाचे आहे, असे कार्यकारी अभियंता एम.एम. पटेल यांनी सांगितले.