विनापरवाना दारूप्रकरणी ढाबा मालक, मद्यपींना न्यायालयाचा ५९ हजारांचा दंड
By राजकुमार जोंधळे | Published: January 6, 2023 07:04 PM2023-01-06T19:04:24+5:302023-01-06T19:04:49+5:30
लातुरात धाडी : उत्पादन शुल्कच्या पथकाची धडक कारवाई
लातूर : शहरालगत असलेल्या ढाब्यावर अवैध दारूप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाडी मारत ढाबा मालकांसह मद्यपींना ताब्यात घेतले. याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून दारूसाठ्यासह १० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन ढाबा मालकांसह एकूण २० मद्यापींना ५९ हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ४ आणि ५ जानेवारी राेजी लातूर शहरालगत असलेल्या ढाब्यावर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी ढाबा चालकांसह एकूण २० जणांना ताब्यात घेण्यात आले हाेते. त्यांच्याकडून विदेशी दारूसाठाही जप्त करण्यात आला हाेता. त्यांच्याविराेधात कलम ६८ आणि ८४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आली हाेती. त्यांना लातूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तीन ढाबा मालकांसह २० मद्यपींना एकूण ५९ हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे. विनापरवाना दारू बाळगणाऱ्या, पिणाऱ्यांविराेधात लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.
पथकात लातूर विभागाचे निरीक्षक आर. एम. बांगर, उदगीर विभागाचे निरीक्षक आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, आमेल शिंदे, स्वप्नील काळे, ए. बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, अनंत कारभारी, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, हणमंत मुंडे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके यांचा समावेश आहे.