धनगर समाजाचे ढोल बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 04:55 PM2020-09-25T16:55:03+5:302020-09-25T16:56:28+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
लातूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा अध्यादेश काढून त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली एसटी आरक्षणाची याचिका वेळ न लावता फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावी. मागील सरकारने धनगरांसाठी जाहीर केलेल्या आदिवासींच्या सवलती त्वरित लागू करून मंजूर केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी तसेच धनगर समाजातील मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचे कायदे करून संरक्षण देण्यात यावे, धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोणतीही नोकर भरती करू नये या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.
समन्वयक अनिल गोयकर, देवा गडदे, राहुल पाटील, अतिश बैकरे, अॅड. विक्रम मदने, राजू काळे, सुजित वाघे, सिद्धेश्वर करे, सोमनाथ काळे, पप्पू सूरनर, अनिरुद्ध येचाळे, अॅड. प्रकाश काळे, अभिजीत मदने, गणेश सरवदे, रमेश सुरवसे, लालासाहेब डोलारे, अमोल घायाळ, अनिल पुजारी, दत्ता सरवदे, दिलीप गोटके यांच्यासह सकल धनगर समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती.