मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी अहमदपूरात धरणे आंदोलन
By हरी मोकाशे | Published: February 20, 2023 07:03 PM2023-02-20T19:03:10+5:302023-02-20T19:03:41+5:30
तहसीलसमोर आंदोलकांनी केली जोरदार घोषणाबाजी
अहमदपूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी शहरातील जुने बसस्थानक परिसरातील नागरिकांनी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात येऊन लक्ष वेधण्यात आले.
शहरातील मुख्य रस्त्यानजिक अतिक्रमणे करण्यात येऊन टोलेजंग इमारती बांधण्यात आल्या आहेत. अतिक्रमणामुळे अपघात वाढले आहेत. ही अतिक्रमणे हटवून जागा खुली करावी, शहरातील आयटीआय व महामार्गालगतच्या सर्विस रोडवर दुकाने बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. ती थांबवून कायदेशीर कार्यवाही करावी. शहरासाठी नवीन कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्यासाठी कोट्यवधीचा खर्च करण्यात आला. मात्र, जलवाहिनीसाठी व्यवस्थितरित्या खोदकाम करण्यात आले नाही, त्याची चौकशी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवकुमार उटगे, सुभाष शेटकर, शिवराज शेटकर, युनूसखाँ गोलंदाज, सुरेश रत्नपारखे, बाबाराव बिराजदार, जगन्नाथ स्वामी, अलीम सय्यद, इमाम सय्यद, समीर शेख, अमर कुरेशी, मारुती साबदे, सुरेश सूर्यवंशी, महादेव शिवपुजे, राईस मुल्ला, वैभव शेटकर, सोनू शेटकर, शकुंतलाबाई हुंडेकरी, नागीनबाई महाजन, सुमनबाई स्वामी, सुरेखाबाई कदम, शिवाजीराव पाटील, ज्ञानोबा सुक्रे, अजीम सय्यद, नवीद लष्करी, मैनोद्दीन सय्यद, ख्वॉजासाब तांबोळी, फारूक पटेल, सय्यद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.