जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचे धरणे आंदोलन; आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याची मागणी
By हरी मोकाशे | Published: November 28, 2022 06:48 PM2022-11-28T18:48:07+5:302022-11-28T18:50:24+5:30
लातूर : आश्वासित प्रगती याेजनेचा १०,२०,३० चा आर्थिक लाभ द्यावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या ...
लातूर : आश्वासित प्रगती याेजनेचा १०,२०,३० चा आर्थिक लाभ द्यावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस गंगाधर एनाडले यांच्या नेतृत्वाखाली झाले. आश्वासित प्रगती योजनेचा पहिला, दुसरा व तिसरा लाभ देण्यात यावा. दुसऱ्या चुकीच्या लाभाची दुरुस्ती करुन ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे तिसरा लाभ मंजूर करण्यात यावा. शासनाच्या आदेशानुसार दर महिन्याच्या एक तारखेस वेतन देण्यात यावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जी.जी. येरटे, पी.एस. जाधव, सी.जी. काटे, एस.एस. कुलकर्णी, एन.पी. गायकवाड, एस.जी. गायकवाड, कुलकर्णी, सी.के. वाघमारे, सी.आर. इंगळे, आर.टी. नरहरे, एस.आर. हाळे, ए.जी. पुरी, डी.बी. बनसोडे, एस.पी. कांबळे, एम.बी. शेवाळे, के.जी. सोनकांबळे, सी.जी. कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.