वाहनधारकांनो दंड भरलात का? अन्यथा...खटले होणार दाखल..!

By राजकुमार जोंधळे | Published: November 23, 2022 05:49 PM2022-11-23T17:49:29+5:302022-11-23T17:49:56+5:30

लातूर जिल्ह्यात वाहनधारकांकडे थकला दहा काेटींचा दंड 

Did the motorists pay the fine? Otherwise...lawsuits will be filed..! | वाहनधारकांनो दंड भरलात का? अन्यथा...खटले होणार दाखल..!

वाहनधारकांनो दंड भरलात का? अन्यथा...खटले होणार दाखल..!

Next

- राजकुमार जोंधळे
लातूर :
जिल्ह्यातील वाहनधारकांना नियमांचे उल्लंघन करणे चांगलेच अंगलट आले असून, ऑक्टाेंबरअखेर तब्बल १ लाख २ हजार २०४ वाहनधारकांवर एकूण २ लाख १६ हजार २७० ऑलाईन चालन फाडण्यात आले आहेत. यातून तब्बल ९ काेटी ५९ लाख ५४ हजार ९०० रुपयांचा दंड केला आहे. या दंडाच्या वसुलीसाठी पाेलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, वाहनधारकांकडून फारसा त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे समाेर आले आहे. वाहनधारकांनाे दंड भरलात का? अन्यथा... तुमच्यावर खटला दाखल करण्यात येणार आहे. याबाबत पाेलीस दलाकडून हालचाली सुरु आहेत.

‘काेराेना’मुळे माेठ्या प्रमाणावर वाहनधारकांकडे दंडाची रक्कम थकली आहे. या वसुलीसाठी त्या-त्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. शिवाय, वाहतूक शाखेच्या वतीनेही प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय लाेकअदालतमध्ये दंडाच्या थकबाकीपाेटी तडजाेड करण्याच्या सूचना, आदेश पाेलीस दलाकडून दिले जात आहेत. मात्र, वाहनधारकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचे समाेर आले आहे. आता याबाबत ठाेस निर्णय घेण्याची शक्यता पाेलीस दलाकडून वर्तविली जात आहे. वाहनधारकांना दंडाची रक्कम भरण्याचा तगादा लावला जात आहे. तर १२ नाेव्हेंबरराेजी लातूरसह जिल्ह्यातील तालुकास्तरावर झालेल्या राष्ट्रीय लाेकअदालत झाली. यापूर्वी संबंधित वाहनधारकांच्या माेबाइलवर मेसेज, एसएमएस पाठविण्यात आले हाेते. मात्र, या माेहिमेला वाहनधारकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला आहे.

अनेकांवर केले खटले दाखल...
माेटारवाहन कायद्यानुसार अनेक वाहनधारकांवर पाेलिसांनी खटले दाखल केली आहेत. एकाच वाहनावर दाेन-तीनदा केलेल्या दंडाची रक्कम थकली आहे. ही रक्क्म ५०० रुपयांपासून ५० हजारांच्या घरात आहे. दंडापाेटी करण्यात आलेल्या काेट्यवधींच्या वसुलीचे पाेलिसासमाेर माेठे आव्हान आहे.

दंड भरा अन्यथा कारवाई अटळ...
ज्या वाहनांवर खटले आणि ऑनलाईन चलान फाडण्यात आले आहेत. अशांनी तातडीने संबंधित ठाण्यात, वाहतूक शाखेकडे अथवा थेट ऑनलाइन दंडाची रक्कम भरावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 
- सुनिल बिर्ला, पाेलीस निरीक्षक, लातूर

 

Web Title: Did the motorists pay the fine? Otherwise...lawsuits will be filed..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.