शिवाजी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्रांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 AM2021-07-22T04:14:09+5:302021-07-22T04:14:09+5:30
सरस्वती विद्यालयाचा शंभर टक्के निकाल पानगाव : येथील सरस्वती विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, एकूण ६४ ...
सरस्वती विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
पानगाव : येथील सरस्वती विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, एकूण ६४ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. विशेष प्रावीण्यात २१, प्रथम श्रेणीत १८, तर द्वितीय श्रेणीत १५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. गुणवंतांमध्ये अथर्व मुळे, वैष्णवी रोकडे, मेघा जाधव यांचा समावेश आहे. यशस्वीतांचे मानव विकास संस्थेचे अध्यक्ष किशनराव भंडारे, सचिव व्यंकटराव अणामे, प्राचार्य धर्मराज चेगे, मुख्याध्यापक बी. आर. फुले, आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
माऊली विद्यार्थी विकास केंद्रात गुणवंतांचा सत्कार
पानगाव : रेणापूर तालुक्यातील माऊली विद्यार्थी विकास केंद्र येथे दहावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ओमकेश दराडे, प्रतीक्षा मोटेगावकर, ऋषिकेश दराडे, सोमनाथ केंद्रे, श्रावणी शेंडगे, अभिषेक बरुळे, गणेश घुले, मंगेश सोळुंके यांचा समावेश आहे. अध्यक्षस्थानी सचिव गंगाधर आरडले होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष तानाजी बेवनाळे पाटील, चंद्रकांत आरडले, प्राचार्या कविता आरडले यांची उपस्थिती होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य शत्रुघ्न गजभार, व्यंकटराव आरडले, भानुदास आरडले, आशा कपाळे, मीना धनेगावे यांनी कौतुक केले आहे.
किल्लारीत कौटुंबिक सल्ला केंद्रास प्रारंभ
किल्लारी : येथे नारी प्रबोधन मंच व सावित्रीबाई फुले युवती मंच शहीद भगतसिंग महाविद्यालयाच्या वतीने किल्लारी आणि परिसरातील कौटुंबिक व घरगुती वाद-विवाद सामोपचारातून सोडविण्यासाठी नारी प्रबोधन मंच कौटुंबिक सल्ला केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्षा सुमतीताई जगताप, उपाध्यक्ष प्राचार्य कुसुमताई मोरे, हेमलता वैद्य, मयूरी सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मयूरी सामंत, क्रांती बिराजदार, प्रा. डॉ. दैवशाला नागदे, मीनाक्षी स्वामी, केरनाथ कांबळे, विकास पवार, देशमुख, आदींसह नारी प्रबोधन मंचाचे सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
शिवसंपर्क अभियान अंतर्गत कार्यकर्ता मेळावा
चिंचोली ब : येथे कार्यकर्त्यांचा मेळावा जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या उपस्थितीत पार पडला. झाला. यावेळी अपंग, विधवा, वृद्ध निराधारांना संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज वाटप करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी महिला जिल्हा संघटक सुनीता चाळक, उपजिल्हाप्रमुख बी. एन. डोंगरे, तालुकाप्रमुख ॲड. प्रवीण मगर, शीतल राजकुमार सुरवसे, कैलास पाटील, महादेव काळे, राजकुमार सुरवसे, मल्हारी तनपुरे, विष्णू शिंदे, प्रकाश अंधारे, आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.