उजना येथे मास्क, सॅनिटायझर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:59+5:302021-05-16T04:18:59+5:30
... निलंग्यातील पाण्याची समस्या सोडवावी निलंगा : शहरात पालिकेकडून नवीन नळजोडणीसाठी शुल्काची सक्ती केली जात आहे. त्यासाठी गल्लीतील बोअर ...
...
निलंग्यातील पाण्याची समस्या सोडवावी
निलंगा : शहरात पालिकेकडून नवीन नळजोडणीसाठी शुल्काची सक्ती केली जात आहे. त्यासाठी गल्लीतील बोअर बंद केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. पाणीप्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी महिलांनी पालिकेकडे केली आहे. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजित निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. सध्या शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
...
हेर ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन
उदगीर : तालुक्यातील हेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर, छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सारिका सूर्यवंशी, उपसरपंच तुळशीराम बेंबडे, ग्रामविकास अधिकारी बी.एस. मुसळे, प्रकाश मिटकरी, आबासाहेब पाटील, प्रभू हुडगे, श्यामराव सोनकांबळे, बाबुराव कोरे, अविनाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
...
उजनी ग्रामपंचायतीत जयंती कार्यक्रम
औसा : तालुक्यातील उजनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच युवराज गायकवाड, उपसरपंच योगिराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कोपरकर, माजी सदस्य बसवराज बरदापुरे, सोसायटीचे चेअरमन सिध्देश्वर गंगणे, उमाकांत बरदापुरे, राजकुमार मुकडे, श्रीशैल्य मुकडे, सुमित मुकडे, पिंटू उंबरदंड, लक्ष्मण मुकडे, चेतन मलंग आदी उपस्थित होते.
...
वीज पडून दाेन गायी दगावल्या
निलंगा : तालुक्यातील अनसरवाडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, गावातील शेतकरी बाळू गायकवाड यांनी झाडाखाली बांधलेली एक गाय व कालवडीवर वीज पडली. ती दोन्ही जनावरे दगावली. सदरील शेतक-यास नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. गत आठवड्यापासून निलंगा तालुक्यात सतत वादळी वा-यासह अवकाळी पाऊस होऊन नुकसान होत आहे.