जिल्हा बँकेतर्फे वर्षभरात २२ कोटींच्या कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:57 AM2020-12-04T04:57:17+5:302020-12-04T04:57:17+5:30

जळकोट : जळकोट तालुक्यात २०१९- २०२० या वर्षभराच्या कालावधीत सुमारे २२ कोटी रुपयांच्या कर्जाचे शून्य टक्के व्याज दराने वाटप ...

District Bank disburses loan of Rs. 22 crore during the year | जिल्हा बँकेतर्फे वर्षभरात २२ कोटींच्या कर्जाचे वाटप

जिल्हा बँकेतर्फे वर्षभरात २२ कोटींच्या कर्जाचे वाटप

Next

जळकोट : जळकोट तालुक्यात २०१९- २०२० या वर्षभराच्या कालावधीत सुमारे २२ कोटी रुपयांच्या कर्जाचे शून्य टक्के व्याज दराने वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांनी बुधवारी दिली.

यावेळी धर्मपाल देवशेट्टे म्हणाले, पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत जळकोट तालुक्यातील ३३४ शेतकरी सभासदांना ३० लाख ४० हजारांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील १ हजार ९५५ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. त्यात सुमारे ५ कोटी ६४ लाखांचे कर्ज माफ झाले आहे. १ हजार १९२ शेतकरी सभासदांना सुमारे २ कोटी ८० लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले. असून हे सर्व थकबाकीदार आहेत. एकूण जळकोट तालुक्यात २२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे, असे संचालक धर्मपाल देवशेट्टे, शाखा तपासणीस रवी अंबेसंगे, भास्कर केंद्रे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, सरपंच दाऊद बिरादार, बाळू देवशेट्टे, खादरभाई लाठवाले, नगरसेवक शिवानंद देशमुख उपस्थित होते. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून गाई- म्हशींसाठी कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

Web Title: District Bank disburses loan of Rs. 22 crore during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.