७ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुटी, २८ नोव्हेंबरला पुन्हा भरणार
By संदीप शिंदे | Published: October 11, 2023 06:53 PM2023-10-11T18:53:28+5:302023-10-11T18:55:01+5:30
तब्बल २१ दिवसांची मिळणार दिवाळीची सुट्टी
लातूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी दिवाळीची सुट्टी जाहीर केली असून, ७ ते २७ नोव्हेंबर असे २१ दिवस सुट्टी राहणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी शाळा पुर्ववत सुरू होणार आहेत.
यंदाची दिवाळी १० ते १४ नोव्हेंबर या कालावधीत साजरी होत असून, मंगळवारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने सुटीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ७ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी राहणार आहे. तसेच शाळा व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय सुट्टीवरील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी आदेशात म्हंटले आहे.
यंदा दिवाळी एक महिना उशिरा...
यंदाच्या वर्षात अधिक मासचा महिना आल्याने दिवाळी एक महिना उशिरा आली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी आली होती. यंदा मात्र, अधिक मासमुळे ही दिवाळी नोव्हेंबर महिन्यात आली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टीचे परिपत्रक काढले आहे. यात २१ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.