जिल्हा परिषद शाळा बंद करू नका; राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे धरणे
By हरी मोकाशे | Published: November 12, 2022 07:18 PM2022-11-12T19:18:06+5:302022-11-12T19:18:21+5:30
अहमदपूर तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात आले
अहमदपूर (जि. लातूर) : राज्यातील जिल्हा परिषदेच्या ० ते २० पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, म्हणून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रोटॉनचे जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश ननीर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी तुपकर, तालुका महासचिव अरविंद डाके, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. बालाजी कारामुंगीकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष व्यंकुराम उगिले, महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश भालेराव, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर गायकवाड, भाऊसाहेब मुंढे, राजेंद्र सोमवंशी, जाफर शेख, संकेत गिरी, मिलिंद दाभाडे, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे चार टप्प्यांत आंदोलन होत आहे. शनिवारी सर्व तालुका, जिल्हा मुख्यालयासमोर शाळा वाचवा, शिक्षण वाचवा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.दरम्यान, या आंदोलनास महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, सेवानिवृत्त मागासवर्गीय कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटनांनी पाठिंबा दर्शविला.