डॉक्टरांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:57+5:302021-07-23T04:13:57+5:30

आयएमएच्या महिला विंगच्यावतीने डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डॉक्टरांसाठी एक वेबिनार घेण्यात आला. आयएमए वुमन्स विंगच्या लातूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. मोहिनी ...

Doctors should also take care of their own health | डॉक्टरांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी

डॉक्टरांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी

Next

आयएमएच्या महिला विंगच्यावतीने डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डॉक्टरांसाठी एक वेबिनार घेण्यात आला.

आयएमए वुमन्स विंगच्या लातूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. मोहिनी गानू, उपाध्यक्षा डॉ. प्रीती बादाडे, सचिव डॉ. राजश्री सावंत यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे व गडचिरोली येथील सर्च या संस्थेचे संचालक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी या वेबिनारच्या माध्यमातून राज्यभरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले.

कोरोनामुळे आरोग्य क्षेत्रावर मोठा ताण पडला. सहाजिकच डॉक्टरांनाही शारीरिक व मानसिक ताण सहन करावा लागला. या काळात डॉक्टरांना वैयक्तिक आयुष्य विसरून जात रुग्णसेवा करावी लागली. सर्व डॉक्टर्स या संकटाला खंबीरपणे सामोरे गेले. या काळात आलेल्या अडचणी, सहन करावा लागलेला ताणतणाव, आरोग्यविषयक तक्रारी यासंदर्भात दोन्ही मान्यवरांनी उपयुक्त सूचना केल्या. डॉक्टरांनी समाजाशी कसे संबंध ठेवावेत? समाज व शासनाकडून डॉक्टरांच्या काय अपेक्षा आहेत? यासंदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले.

संकटाची तमा न बाळगता या आपत्तीला धैर्य आणि सक्षमपणे तोंड दिल्याबद्दल कोरोना वॉरियर्स डॉक्टरांचे त्यांनी कौतुक केले. डॉक्टरांनी स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी काय करावे? याचाही सल्ला डॉ. अभय बंग यांनी दिला.

प्रास्ताविक डॉ. कल्याणी सास्तुरकर यांनी केले. दरम्यान, आयोजकांच्यावतीने पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे व डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयएमए वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. मोहिनी गानू, सचिव डॉ. राजश्री सावंत, सहसचिव डॉ. सुवर्णा कोरे, कोषाध्यक्षा डॉ. चारुशीला उदगीरकर, सहकोषाध्यक्षा डॉ. स्नेहल शिवपुजे, राज्य प्रतिनिधी डॉ. संगीता देशपांडे यांची उपस्थिती होती.

Web Title: Doctors should also take care of their own health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.