उजनीत योगीराज पाटील यांच्या जनसेवा ग्रामविकासचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:50+5:302021-01-23T04:19:50+5:30
उजनी येथील ग्रामपंचायत निवडणूक ही दुरंगी झाली होती. प्रभाग १ मधून अनिल कळबंडे, अक्षरा चव्हाण, शर्मिला वळके या विजयी ...
उजनी येथील ग्रामपंचायत निवडणूक ही दुरंगी झाली होती. प्रभाग १ मधून अनिल कळबंडे, अक्षरा चव्हाण, शर्मिला वळके या विजयी झाल्या. प्रभाग २ मध्ये श्याम सूर्यवंशी, प्रवीण कोपरकर, विजया ढवण, प्रभाग ३ मध्ये योगीराज पाटील, रंजना रंदवे, लक्ष्मी सगट, प्रभाग ४ मध्ये मंजरखान पठाण, शामिना शेख, शालू कोळी, प्रभाग ५ मध्ये दीपाली देवकर, शेखर चव्हाण, युवराज गायकवाड हे विजयी झाले आहेत.
३८ उमेदवार होते रिंगणात...
उजनीतील १५ जागांसाठी ३८ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे यांच्या बाजूने गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन, सोसायटी, पंचायत समिती सदस्य होते. या सर्वांनी योगीराज पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, योगीराज पाटील यांनी बाजी मारली आहे.