'तक्रार आली तर गुन्हा दाखल करू नका'; मध्यरात्री ठाण्यात तिघांचा राडा, पोलिसांना धमकावले

By राजकुमार जोंधळे | Published: August 9, 2023 01:43 PM2023-08-09T13:43:20+5:302023-08-09T13:44:18+5:30

लातुरातील विवेकानंद चाैक ठाण्यातील घटना, तिघांविराेधात गुन्हा दाखल!

'Don't file a case if you get a complaint'; In the middle of the night, the three shouted in Thane, threatened the police | 'तक्रार आली तर गुन्हा दाखल करू नका'; मध्यरात्री ठाण्यात तिघांचा राडा, पोलिसांना धमकावले

'तक्रार आली तर गुन्हा दाखल करू नका'; मध्यरात्री ठाण्यात तिघांचा राडा, पोलिसांना धमकावले

googlenewsNext

लातूर : पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्यांसोबत आमच्या विराेधात गुन्हा दाखल करून घेऊ नका, असे म्हणून हुज्जत घालत धमकी दिल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. याबाबत बुधवारी पहाटेच्या सुमारास तिघांविरोधात लातुरातील विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात चंद्रकला वसंत कारभारी (रा. पुणे, ह .मु. हरिभाऊनगर, लातूर), अमोल माधव सूर्यवंशी (रा. पुणे, ह. मु. उदगीर), श्रीकांत दत्तात्रय सूर्यवंशी (रा. हरिभाऊनगर, लातूर) यांनी आमच्या विराेधात आलेली तक्रार घेऊ नका, गुन्हा दाखल करू नका, असे म्हणून अश्लील भाषा वापरली. शिवाय, शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करत धमकी दिली. यावेळी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसा कर्मचाऱ्यांशी त्यांनी हुज्जत घातल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. 

याबाबत विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी जरिना महेताब साब सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात बुधवारी पहाटेच्या सुमारास गुरनं. ४४७ / २०२३ कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, २९४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक एच. जे. सय्यद करीत आहेत.

Web Title: 'Don't file a case if you get a complaint'; In the middle of the night, the three shouted in Thane, threatened the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.