लातूरला घरणी प्रकल्पाचे पाणी देऊ नका, ग्रामस्थांनी केले जागर आंदोलन

By संदीप शिंदे | Published: July 4, 2023 06:25 PM2023-07-04T18:25:15+5:302023-07-04T18:28:02+5:30

घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरच्या वाढीव वसाहतीस घेऊन जाण्यासाठी कोट्यवधींच्या जलवाहिनी योजनेस मंजुरी देण्यात आली आहे.

Don't give Gharani project water to Latur, villagers staged Jagar protest | लातूरला घरणी प्रकल्पाचे पाणी देऊ नका, ग्रामस्थांनी केले जागर आंदोलन

लातूरला घरणी प्रकल्पाचे पाणी देऊ नका, ग्रामस्थांनी केले जागर आंदोलन

googlenewsNext

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणीलातूरला नेण्यास पाणी बचाव समितीचा विरोध असून, मागील आठवडाभरापासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार, मंगळवारी प्रशासनाला जाग यावी, यासाठी येथे जागर आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील शिवपूर येथील घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरच्या वाढीव वसाहतीस घेऊन जाण्यासाठी कोट्यवधींच्या जलवाहिनी योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. पाइपलाइनचे वापरून खोदकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विविध गावांतील शेतकरी, शेतमजूर, सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. रास्ता रोको, मोर्चा, अन्नत्यागासह विविध पद्धतींनी आंदोलन करून, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कामास कायमस्वरूपी स्थगिती देण्यात यावी, यासाठी धरणे आंदोलन सुरूच असून, मंगळवारी दिवसभर जागर आंदोलन करून रात्री, भजन करण्यात आले. यावेळी पाणी बचाव समितीतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Don't give Gharani project water to Latur, villagers staged Jagar protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.