खड्डेमय रस्त्यामुळे खासगी वाहतूकदारही धजेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:41+5:302021-09-04T04:24:41+5:30

जिरगा-जळकोट-रावणकोळा हा १५ किमीचा रस्ता आहे. या रस्त्यावर सतत वाहतूक असते. परंतु, या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ...

Due to the bumpy road, even the private carriers are not afraid | खड्डेमय रस्त्यामुळे खासगी वाहतूकदारही धजेनात

खड्डेमय रस्त्यामुळे खासगी वाहतूकदारही धजेनात

Next

जिरगा-जळकोट-रावणकोळा हा १५ किमीचा रस्ता आहे. या रस्त्यावर सतत वाहतूक असते. परंतु, या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, या मार्गावरील बससेवाही बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु, खासगी वाहनधारकही या मार्गावर जाण्यास धजावत नाहीत.

या रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत यापूर्वी सर्वेक्षण झाले आहे. कामासाठी सुमारे १७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, अद्यापही रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्याचे मजबुतीकरण करण्याबरोबर जागोजागी पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी जिरगा, सांगवी, जळकोट, रावणकोळा येथील नागरिकांतून करण्यात येत आहे.

जिरगा, धामणगावमोड, जळकोट, हळद वाढवणा आणि पुढे रावणकोळा हा १५ किमीचा रस्ता असून येथी नागरिकांसाठी जळकोटची बाजारपेठ आहे. त्यामुळे या भागातील नागरिक दररोज येथे ये-जा करीत असतात. रस्त्याची दैना उडाल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच सातत्याने वाहने पंक्चर होत आहेत. हा रस्ता ३० फूट रुंदीचा करण्यात यावा, अशी मागणी जळकोट बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, जिल्हा परिषद सदस्य संतोष तिडके, पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबिडे, उपसभापती नंदा धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, नगरसेवक शिवानंद देशमुख, सत्यवान पाटील दळवे, खादरभाई लाटवाले, माजी उपसरपंच सत्यवान पांडे, संतोष पवार, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील आगलावे, संतोष चव्हाण, नबी शेख, सोमेश्वर सोप्पा, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र नागरगोजे, बालाजी केंद्रे, बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब दळवे यांनी केली आहे.

पाहणीनंतर अंतिम मंजुरी...

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. मात्र, दिल्लीच्या कमिटीकडून अद्यापही पाहणी करण्यात आली नाही. अंतिम बैठकीनंतर दिल्लीची समिती रस्त्याची पाहणी करण्यासाठी आठवडाभरात जळकोटला येईल आणि अंतिम मंजुरी दिली जाईल. त्यानंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

Web Title: Due to the bumpy road, even the private carriers are not afraid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.