दुष्काळी परिस्थिती आणि कर्जामुळे देवणीत शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 06:53 PM2019-01-02T18:53:41+5:302019-01-02T18:54:21+5:30
बँकेसह खाजगी कर्ज आहे़ त्यातच शेतीतून काहीही उत्पादन न निघाल्याने ते चिंताग्रसत होते.
देवणी ( लातूर) : दुष्काळी परिस्थिती व वाढत्या कर्जामुळे चिंताग्रस्त झालेल्या देवणी येथील एका शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
दीपक माणिकराव सगर (४०, रा़ देवणी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे़ दीपक सगर यांना एक एकर कोरडवाहू शेती आहे़. त्यांच्यावर बँकेसह खाजगी कर्ज आहे़ त्यातच शेतीतून काहीही उत्पादन न निघाल्याने ते चिंताग्रसत होते, असे नातेवाईकांनी सांगितले़ दरम्यान, बुधवारी सकाळी शेतात त्यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले़ देवणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला़ त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.