पर्यावरणाच्या असमतोलामुळे पर्जन्यमानाचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 07:19 PM2019-07-13T19:19:33+5:302019-07-13T19:19:59+5:30

कमी होत चाललेला पाऊस चिंताजनक

Due to the imbalance of the environment, the percentage of rainfall has decreased | पर्यावरणाच्या असमतोलामुळे पर्जन्यमानाचे प्रमाण घटले

पर्यावरणाच्या असमतोलामुळे पर्जन्यमानाचे प्रमाण घटले

googlenewsNext

- संदीप शिंदे

राज्यभरात सगळीकडे पावसाचे जोर कायम आहे़ मात्र मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे़ दिवसेंदिवस पर्जन्यमानाचे कमी होत जाणारे प्रमाण चिंताजनक आहे़ वृक्षसंवर्धन हा त्यावरील प्रमुख उपाय आहे़ त्यामुळे वृक्षचळवळीबरोबरच प्रदुषण कमी करण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत भुगोल तज्ज्ञ सुरेश फुले यांनी व्यक्त केले़ त्यांच्याशी साधलेला संवाद़़़

पावसाचे प्रमाण कमी होण्याची प्रमुख कारणे कोणती? 

मानव आणि निसर्गनिर्मीत कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे़ मराठवाड्याचा नैसर्गिकरित्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात समावेश होतो़ वृक्षाचे कमी झालेले प्रमाण, शहरीकरण, औद्यागीकीकरणाचे वाढलेले क्षेत्र, कृषी क्षेत्रात घट होऊन वाढणारे वस्तीकरण या कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे़ कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड या प्रदुषक तत्वाचे हवेमध्ये आवश्यकतेपेक्षा प्रमाण जास्त असल्यास प्रतिकुल परिस्थीती निर्माण होते़ परिणामी ढग येते पण पाऊस पडत नाही़ अशी स्थिती जिल्ह्यात सध्या दिसत आहे़

पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची गरज आहे ?  
कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे, हवेचे प्रदुषण कमी करणे गरजेचे आहे़ लोकसंख्या वाढीमुळे सुख-सुविधा वाढत ्नचालल्या आहेत़ मात्र त्या पुरविण्यास निसर्ग असमर्थ होत चालला आहे़ निसर्गाचे संवर्धन आणि जतन होणे आवश्यक आहे़ तरच पावसाचे प्रमाण वाढविण्यास मदत होऊ शकेल़

पावसाची सरासरी कशाप्रकारे ठरविली जाते? 
मागील पावसाच्या सरासरीवर पर्जन्यमान ठरविले जाते़ गेल्या २५ ते ३० वर्षांत काळानुरुप पावसात घट होत आहे़ मराठवाड्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून ७० ते ८० टक्के पाऊस मिळतो तर ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे उर्वरीत पाऊस मिळतो़मराठवाड्यात वनाचे क्षेत्र अत्यल्प आहे़ ३३ वनक्षेत्राची आवश्यकता असताना लातूर जिल्ह्यात केवळ ०़०१ टक्के वनाचे क्षेत्र आहे़ त्यामुळे वनसंवर्धनाबरोबरच वृक्षलागवड चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे़ इतर प्रदेशात वनक्षेत्र अधिक असल्याने पाऊसाचे प्रमाण समाधानकारक आहे़

वातावरणात सांद्रीभवन झाले तरच पाऊस
शहराची वाढत चाललेली लोकसंख्या, वायुचे प्रदुषण, औद्योगिक प्रदुषण, कृषी क्षेत्रात होत असलेल्या घटीमुळे वातावरणात अनपेक्षीत बदल होत आहे़ कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड या प्रदुषक तत्वाचे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाण असल्यास पाऊस पडण्यास प्रतिकुल परिस्थीती निर्माण होते़ वातावरणात सांद्रीकरण होणे गरजेचे आहे़ या प्रक्रीयेवरच पर्जन्यमान अवंलबुन असते़ सांद्रीकरण न झाल्यास पाऊसास विलंब होऊ शकतो़ असेही सुरेश फुले यांनी सांगितले़

Web Title: Due to the imbalance of the environment, the percentage of rainfall has decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.