पाण्याचा अंदाज न आल्याने शेतक-याचा तलावात बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 06:50 PM2017-08-29T18:50:56+5:302017-08-29T18:52:08+5:30

बोळेगाव ( बु ) येथील शेतकरी मुक्तेश्वर गौंड हे सोमवारी संध्याकाळी गुरे घेऊन घराकडे येत होते. घराकडे येताना त्यांना घरणी तलावामधून यावे लागते. त्यातून मार्ग काढतांना पाण्याचा अंदाज आला न आल्याने  त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

Due to lack of water estimation, the farmer drowned in a pond and died | पाण्याचा अंदाज न आल्याने शेतक-याचा तलावात बुडून मृत्यू 

पाण्याचा अंदाज न आल्याने शेतक-याचा तलावात बुडून मृत्यू 

googlenewsNext

शिरूर अनंतपाळ (लातूर ), दि.29: बोळेगाव ( बु ) येथील शेतकरी मुक्तेश्वर गौंड हे सोमवारी संध्याकाळी गुरे घेऊन घराकडे येत होते. घराकडे येताना त्यांना घरणी तलावामधून यावे लागते. त्यातून मार्ग काढतांना पाण्याचा अंदाज आला न आल्याने  त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

बोळेगाव ( बु ) येथील मुक्तेश्वर श्रीरंग गौंड ( ४०) हे  सोमवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गुरे घेऊन घराकडे येत होते. रस्त्यातील घरणी तलावास सध्या पाण्याची पातळी वाढली आहे. यातून रोजच मार्ग काढत ते येत असत. यावेळी त्यांना पाण्याच्या पातळीचा अंदाज आला नाही व ते त्यात बुडाले. ते बुडाले परंतु , गुरे  मात्र घरी पोंहचली.

गुरांसोबत मुक्तेश्वर कसे आले नाही. म्हणुन घरातील मंडळीनी मुक्तेश्वर यांचा रात्री उशीरा पर्यंत शोध घेतला. अंधार वाढल्याने रात्री शोध लागला नाही. आज सकाळी तलावाच्या पाण्यात मुक्तेश्वर यांचा मृतदेह आढळुन आला. याची माहिती मिळताच  पोनि सुधाकर जगताप, पोहेकाँ एच. बी. पन्हाळे,जे .एच.शेख यांनी घटना स्थळास भेट दिली. घटनेचा अधिक तपास पोहेकाँ पन्हाळे करीत आहेत.

Web Title: Due to lack of water estimation, the farmer drowned in a pond and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.