पावसामुळे येल्लोरी- बिरवली डांबरी रस्त्यावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:21 AM2021-07-31T04:21:26+5:302021-07-31T04:21:26+5:30
साधारणतः दोन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यमार्ग क्र. ६८ ते रोहिदासनगर बिरवली हा १० किमीचा रस्ता तयार करण्यात येत ...
साधारणतः दोन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यमार्ग क्र. ६८ ते रोहिदासनगर बिरवली हा १० किमीचा रस्ता तयार करण्यात येत आहे. हा रस्ता तयार करण्याचा कालावधी संपुष्टात आला होता. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कालावधी वाढविण्यात आला होता. या रस्त्यावर गुळखेडा गावात काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, पावसाळ्यात रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. खडी उघडी पडली आहे. त्यामुळे वाहनचालकांची कसरत होत आहे.
काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत: शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. औसा अथवा लातूरला जाण्यासाठी बिरवली, येल्लोरी, गुळखेडा येथील नागरिकांसाठी हा रस्ता जवळचा असल्याने या रस्त्यावरून नेहमी रहदारी असते. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.