लातूर मनपा, अंबाजोगाई नगरपालिका मांजरा प्रकल्पाचे सर्वात मोठे थकबाकीदार

By हणमंत गायकवाड | Published: June 9, 2023 07:10 PM2023-06-09T19:10:37+5:302023-06-09T19:11:09+5:30

मांजरा प्रकल्पावर एकूण १८ योजना; पाणी वापर संस्थांकडे ४२ कोटींची थकबाकी!

Dues of 42 crores to water use organizations on Manjra project! | लातूर मनपा, अंबाजोगाई नगरपालिका मांजरा प्रकल्पाचे सर्वात मोठे थकबाकीदार

लातूर मनपा, अंबाजोगाई नगरपालिका मांजरा प्रकल्पाचे सर्वात मोठे थकबाकीदार

googlenewsNext

लातूर : धनेगाव येथील मांजरा नदीवरील प्रकल्पातून लातूर शहरासह अंबाजोगाई केज, धारूर, कळंब, मुरुड, शिराढोण, धनेगाव, लातूर एमआयडीसी आदींसह १८ गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र, या गावांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मांजरा प्रकल्पातील पाणी वापराची पाणीपट्टी नियमित भरली जात नाही. या सर्व संस्थांकडे मिळून ४२ कोटी ४२ हजार ८४२ रुपयांची थकबाकी आहे. वारंवार मागणी करूनही थकबाकी भरली जात नाही. महिन्याला केवळ ३१ लाख ७० हजार ६९५ रुपयांची मागणी असताना नियमित न भरल्याने पाणीपट्टीचा आकडा वाढला आहे.

मांजरा प्रकल्पावरील एकूण १८ योजनांपैकी लातूर महानगरपालिकेकडे सर्वाधिक २४ कोटी ४७ लाख ७८ हजार ६९७ रुपयाची थकबाकी आहे. त्यापूर्वी लातूर शहराचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाणीपुरवठा होता. त्यांच्याकडेही दोन कोटी ७५ लाख २१ हजार ७५९ रुपये थकीत आहेत. तर अंबाजोगाई नगरपालिकेकडे चार कोटी ५१ लाख ९५ हजार ८९९ रुपयांची थकबाकी आहे. कळंब नगरपालिकेकडे बारा लाख ८७ हजार ७४५ रुपयांची थकबाकी असून केज -धारूर बारागावे पाणीपुरवठा योजनेकडे ३६ लाख ४६ हजार ७६६ थकबाकी असून लातूर एमआयडीसीकडे नऊ कोटी ५३ लाख एक हजार १६० रुपयांची थकबाकी आहे. लोहटा ग्रामपंचायतीकडे नऊ लाख १६ हजार ५१४, भालगाव ग्रामपंचायतीकडे १७ हजार ७५५, युसुफ वडगाव ग्रामपंचायतीकडे दोन लाख ३९ हजार ८५१, माळेगाव ग्रामपंचायतीकडे एक हजार ९००, धनेगाव ग्रामपंचायतीकडे ७५ हजार ५३८, आवड शिरपुरा ग्रामपंचायतीकडे ९९ हजार ६१६, शिराढोण ग्रामपंचायतीकडे तीन लाख ६९ हजार १३९, मुरुड ग्रामपंचायतीकडे दाेन लाख ४२ हजार ८४३, आनंदगाव शुगर सारणीकडे एक लाख आठ हजार ४२५, साळेगाव ग्रामपंचायतीकडे ८० हजार ८०३, करंजकल्ला ग्रामपंचायतीकडे ७६ हजार सहा, दाभा ग्रामपंचायतीकडे ३९ हजार ४७९ आणि हिंगणगाव ग्रामपंचायतीकडे ४२ हजार ९३९ रुपये थकबाकी आहे. एकूण १८ पाणीपुरवठा योजनांकडे ४२ कोटी ४२ हजार ८४२ रुपयांची थकबाकी थकली आहे. या पाणी वापर संस्थांनी पाणीपट्टीची थकबाकी भरावी, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Dues of 42 crores to water use organizations on Manjra project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.