गणेश विसर्जन उत्सव काळात लातूर जिल्ह्यात शंभर जणांना प्रवेशबंदी

By हणमंत गायकवाड | Published: September 8, 2022 06:16 PM2022-09-08T18:16:01+5:302022-09-08T18:16:35+5:30

यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात साजरा होत आहे.

During Ganesh Visarjan Utsav, 100 people are banned from entering Latur district | गणेश विसर्जन उत्सव काळात लातूर जिल्ह्यात शंभर जणांना प्रवेशबंदी

गणेश विसर्जन उत्सव काळात लातूर जिल्ह्यात शंभर जणांना प्रवेशबंदी

Next

लातूर : गणेश विसर्जन उत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी शंभर जणांविरुद्ध जिल्ह्यात तात्पुरती प्रवेशबंदी केली आहे. 

यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात साजरा होत आहे. ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. शुक्रवारी गणेश विसर्जन होत आहे. त्यासाठी ८ ते ९ सप्टेंबरपर्यंत फौजदारी दंडसंहिता कलम १४४ (२) अन्वये तात्पुरत्या स्वरूपात शंभर लोकांवर प्रवेशबंदीची कारवाई उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते, शांतता समिती, पोलीस मित्र समिती या सर्वांची पोलीस स्टेशनस्तरावर बैठका घेण्यात आली असून, विसर्जन उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने लातूर जिल्हा पोलीस दल बंदोबस्तासाठी सज्ज आहे.

Web Title: During Ganesh Visarjan Utsav, 100 people are banned from entering Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.