खाद्यतेल १५ रुपयांनी स्वस्त; गृहिणींना मिळाला दिलासा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:17+5:302021-09-27T04:21:17+5:30

पेट्राेल, डिझेल आणि खाद्यतेलाचे दर आकाशाला भिडल्याने सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. आता गॅसचाही दर एक हजारांच्या घरात गेला ...

Edible oil cheaper by Rs 15; The housewives got relief ..! | खाद्यतेल १५ रुपयांनी स्वस्त; गृहिणींना मिळाला दिलासा..!

खाद्यतेल १५ रुपयांनी स्वस्त; गृहिणींना मिळाला दिलासा..!

googlenewsNext

पेट्राेल, डिझेल आणि खाद्यतेलाचे दर आकाशाला भिडल्याने सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. आता गॅसचाही दर एक हजारांच्या घरात गेला आहे. अशा स्थितीमध्ये घरखर्च कसा भागवायचा, हा प्रश्न सतावत आहे. खाद्यतेलामध्ये साेयाबीन, सूर्यफूल, करडई, पामतेल, शेंगदाणा, माेहरी आणि तीळ तेलांमध्ये सर्वाधिक मागणी साेयाबीनच्या तेलाला आहे. सणावाराला या तेलाचा माेठ्या प्रमाणावर वापर केला जाताे.

किराणा खर्चामध्ये बचत...

सध्या पेट्राेल, डिझेल, गॅस आणि खाद्यतेलाचे भाव हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अशास्थितीत किराणावर हाेणारा खर्च आणि तेवढाच खाद्यतेलावर हाेणारा खर्च याची तुलना केली तर जवळपास सारखाच हाेत आहे. सामान्यांच्या आवाक्यात असणारा दर तेलाला मिळाला पाहिजे. - माधुरी हिंप्पळनेरकर

दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सामान्यांचे कंबरडे माेडले आहे. त्याशिवाय, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. अशास्थितीत जगणे मुश्कील झाले आहे. आता तर गॅस एक हजारांच्या घरात गेला आहे. यामुळे सामान्य नागरिक बेजार आहेत.

- माेहिनी लातूरकर

आणि दर कमी झाले...

मलेशियातून भारतात माेठ्या प्रमाणावर पामतेलाची आवक हाेत आहे. शिवाय, सध्या बाजारात नवीन साेयाबीनची आवक वाढली आहे. त्याचबराेबर केंद्र सरकारच्यावतीने तेलावरील कर काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.

- बसवराजअप्पा वळसंगे, लातूर

Web Title: Edible oil cheaper by Rs 15; The housewives got relief ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.