खाद्यतेल वधारले; बजेट काेलमडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:48 AM2021-01-13T04:48:35+5:302021-01-13T04:48:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : किराणामध्ये सध्याला खाद्यतेल महागल्याने गृहिणींचे किचन बजेट काेलमडले तर भाजीपालाही महागला आहे. सध्या कांदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : किराणामध्ये सध्याला खाद्यतेल महागल्याने गृहिणींचे किचन बजेट काेलमडले तर भाजीपालाही महागला आहे. सध्या कांदा ४० रुपयांच्या खाली उतरायला तयार नाही. लग्नसराईमुळे शेवगा प्रतिकिलाे १४० रुपयांवर गेला आहे. खाद्यतेल तब्बल ५० टक्क्यांनी महागले. प्रतिकिलो १०५ रुपयांवरून थेट १५० रुपयांवर पोहोचले आहे. परिणामी, भाजीपाल्यासह किराणाला महागाईची किनार आहे.
लातूरसह जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक जेमतेम आहे. परिणामी, शेवगा प्रति किलो १४० रुपयांच्या घरात आहे. त्यापाठोपाठ गवार ६० रुपये किलोवर पोहोचले आहे. हिरवी मिरची ५० रुपये, फुलगोबी १२ रुपये, पत्तागोबी १२ रुपये, काकडी ३०, पांढरी काकडी १५ रुपये, भेंडी ५० रुपये, वांगी ६० रुपये, कारले ३०, दोडका ४०, भोपळा २०, शेवगा १४०, वरणा ५०, शिमला १५, शेपू, पालक पेंढी प्रत्येकी ५ पेंढी, चुका ८० रुपये किलाे, करडई २०, चंदन बटवा १०, मुळा ३० रुपये गड्डी, मेथी ८ रुपये पेंडी, कोथिंबीर ४० रुपये किलो, कांदा ४०, बटाटा २५, लसूण १००, टोमॅटो २५ रुपये किलो दराने विकला जात आहे.
तूर डाळ १२० रुपये किलाे...
किराणामध्ये खाद्य तेलापाठोपाठ डाळी शंभरीच्या वर आहेत. तूरडाळ १२० रुपये, मूग डाळ १२०, उडीद डाळ ११० रुपये किलो आहे. तर चना डाळ ७०, मसूर डाळ ८० रुपये किलो दर आहे. त्यापाठोपाठ रवा ३०, मैदा ३०, पोहे ४०, दाळवं ८०, बेसण आटा ८०, शाबू ६०, भगर ८०, खोबरं १६० रुपये प्रति किलो विकला जात आहे.
भाजीपाला महाग...
गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. अलीकडे भाजीपाला आवक जेमतेमच आहे. सर्वाधिक महाग शेवगा, हिरवी मिरची आणि गवार आहे. मुळा, वांगी, कारले, दोडके, कांदाही महागला आहे. कांद्याचे भाव मात्र ४० च्या खाली उतरायला तयार नाहीत. हिरवी मिरची तिखट झाली आहे.