लातूर परिमंडळात आठ लाख घरगुती वीजग्राहकांची महावितरणच्या गोग्रीन सुविधेकडे पाठ

By आशपाक पठाण | Published: September 26, 2023 06:42 PM2023-09-26T18:42:25+5:302023-09-26T18:42:59+5:30

कागदविरहीत वीजबील सुविधेवर दहा रूपयांची सवलत

Eight lakh household electricity consumers in Latur circle have been diverted to Gogreen facility of Mahavidran | लातूर परिमंडळात आठ लाख घरगुती वीजग्राहकांची महावितरणच्या गोग्रीन सुविधेकडे पाठ

लातूर परिमंडळात आठ लाख घरगुती वीजग्राहकांची महावितरणच्या गोग्रीन सुविधेकडे पाठ

googlenewsNext

लातूर : महावितरणच्या पर्यावरण पुरक गोग्रीन सुविधेला लातूर परिमंडलातील ८ लाख १८ हजार ४४ ग्राहकांपैकी केवळ १५ हजार ११ ग्राहकांनी कागदविरहित बिलाचा अर्थात गोग्रीन सुविधेचा लाभ घेतला आहे. ही सुविधा घेणाऱ्या ग्राहकांना दरमहा १० रूपयांची सवलत मिळत असली तरी ८ लाख ग्राहकांनी याकडे पाठ फिरविली आहे.

वीजग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे.

११ हजार ग्राहकांनीच निवडला पर्याय...
लातूर परिमंडलांतर्गत लातूर जिल्हयातील लातूर विभाग ३ हजार ६१९, निलंगा विभाग १ हजार ९९ तर उदगीर विभागातील १ हजार ८२७ वीजग्राहकांनी तसेच बीड जिल्हयातील अंबाजोगाई विभागात २ हजार ५४१ व बीड विभागात २५४१ वीजग्राहकांनी गोग्रीन सुविधेला पसंती दिली आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्हयातील तुळजापूर विभागाच्या १ हजार १९९ तर धाराशिवच्या २ हजार २९४ वीजग्राहकांनी गोग्रीन सुविधेला पसंती दर्शविली आहे.

वर्षाला १२० रूपयांची होते बचत...
वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने वीजग्राहकांना प्रत्येक महिन्यातील वीजबिलामागे १० रुपयांची, तर वर्षाला १२० रुपयांची सवलत मिळत आहे. जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील १५ अंकी गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर जाऊन करावी लागणार आहे. वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

Web Title: Eight lakh household electricity consumers in Latur circle have been diverted to Gogreen facility of Mahavidran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.