लातूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

By राजकुमार जोंधळे | Published: October 4, 2023 07:05 PM2023-10-04T19:05:55+5:302023-10-04T19:08:58+5:30

४७ ग्रामपंचायतीचीही हाेणार पाेटनिवडणूक

Election program of 13 gram panchayats of Latur district announced | लातूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

लातूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक आणि ४७ ग्रामपंचायतींमधील ५३ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक हाेणार आहे. यासाठीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यासाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, तसेच पोटनिवडणुकीची नोटीस ६ ऑक्टोबर २०२३ रोजी संबंधित तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत. १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या काळात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. या नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ पासून सुरू होईल. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. याच दिवशी दुपारी ३ नंतर निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

या गावांत हाेणार सार्वत्रिक निवडणूक...
हरंगुळ बु., शामनगर (ता. लातूर), ढोरसांगवी, रामपूर तांडा, मंगरुळ (ता. जळकोट), शिवणी म. (ता. चाकूर), येलोरीवाडी, आलमला, किल्लारी (ता. औसा), तीर्थ, उन्नी जांब (ता. अहमदपूर), तर देवणी तालुक्यातील चवण हिप्परगा, नागतीर्थवाडी गावात निवडणूक हाेत आहे.

या ग्रामपंचायतींत हाेणार पोटनिवडणूक...
बोळेगाव खु., हनुमंत जवळगा, आनंदवाडी, नागदरवाडी, जगळपूर खु. (ता. चाकूर), गव्हाण (ता. रेणापूर), डोंगरेवाडी, वागदरी (ता. देवणी), गाधवड, कासारखेडा, टाकळी शी., भातखेडा, रायवाडी, भातांगळी, भोईसमुद्रगा (ता. लातूर), कुनकी, लाळी बु. (ता. जळकोट), लोहारा, इस्मालपूर, हंडरगुळी (ता. उदगीर), हासाळा, शिंदाळा लो., चलबुर्गा, गांजनखेडा, भंगेवाडी, हासेगाव (ता. औसा), शिवपूर, लक्कड जवळगा, गणेशवाडी, दैठणा, बेवनाळ, येरोळ (ता. शिरूर अनंतपाळ), खरबवाडी, गुंजोटी, परचंडा, धानोरा बु (ता. अहमदपूर), आनंदवाडी गौर, बामणी, सावरी, सिरसी हं., शेळगी, येळणूर, शिवणी कोतल, चिंचोडी, तळीखेड, हलगरा, गुंजरगा (ता. निलंगा) या गावांचा समावेश आहे.

Web Title: Election program of 13 gram panchayats of Latur district announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.