दहावीच्या गुणांवरच होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:24 AM2021-08-12T04:24:12+5:302021-08-12T04:24:12+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला, तर अकरावी प्रवेशासाठी २१ ...

Eleventh admission process will be on 10th marks only! | दहावीच्या गुणांवरच होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया !

दहावीच्या गुणांवरच होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया !

googlenewsNext

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला, तर अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी सीईटी घेण्यात येणार होती. मात्र, न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द केली असून, दहावीच्या गुणांवरच अकरावी वर्गाचे प्रवेश होणार आहे. जिल्ह्यात अकरावी कला शाखेच्या १६ हजार २००, विज्ञान शाखा १७ हजार ६४०, वाणिज्य ५ हजार ४० तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या २ हजार ६० जागा आहेत, तर दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार २८१ आहे. त्यामुळे सर्वच जागांवर प्रवेश होण्याची शक्यता आहे.

६५२ शाळांचा शंभर टक्के निकाल...

जिल्ह्यातील ६६१ पैकी ६५२ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून, २२ हजार ८१९ मुले तर १७ हजार ४६२ मुली असे एकूण ४० हजार २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर झाला असल्याने विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जिल्ह्यात १९७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण...

लातूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील २४, उस्मानाबाद ५७ तर लातूर जिल्ह्यातील १९७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत, तर विभागात १२ हजार ३९३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. दरम्यान, दहावीच्या गुणांवरच प्रवेश होणार असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

आयटीआयच्या ३ हजार ६०४ जागा...

लातूर जिल्ह्यात ११ शासकीय तर ८ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या आहे. यामध्ये शासकीय आणि खाजगी मिळून ३ हजार ६०४ प्रवेश क्षमता आहे. दरम्यान, आयटीआयची प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सुरू असून, गुणवत्ता यादीनुसारच आयटीआयची प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

तंत्रनिकेतनची १ हजार ५०० प्रवेश क्षमता...

जिल्ह्यात दोन शासकीय तर १० खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. शासकीयमध्ये ८०० तर खाजगी तंत्रनिकेतनमध्ये ७०० प्रवेश क्षमता असून, अर्ज प्रक्रिया सुरू असून, गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश होणार असल्याचे प्राचार्य डॉ.के.एम. बकवाड यांनी सांगितले.

अकरावी, आयटीआय, तंत्रनिकेतन एकूण प्रवेश क्षमता - ४६,१४४

कला शाखा - १६,२००

विज्ञान शाखा - १७,६४०

वाणिज्य शाखा - ५,०४०

एमसीव्हीसी शाखा - २,०६०

तंत्रनिकेतन - १,५००

आयटीआय - ३,६०४

गुणांवरच होणार विद्यार्थ्यांचे प्रवेश...

दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झालेला आहे. सीईटी रद्द झाल्याने मेरिटनुसार अकरावीसाठी प्रवेश दिले जातील. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, शाहू महाविद्यालय

विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नाेंदणी करावी लागणार असून त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतरच अकरावी वर्गासाठी प्रवेश दिले जातील. - प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद महाविद्यालय

अकरावीसाठी दरवर्षी गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश देण्यात येतात. यंदा सीईटी होणार होती. मात्र, ती रद्द करण्यात आली असल्याने शासनाच्या निर्देशानुसारच प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाईल. प्राचार्य. डॉ. सिद्राम डोंगरगे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय

शासन निर्णयानुसार महाविद्यालयांना सूचना...

सीईटी रद्द करण्यात आली असली तरी शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांना सूचना केल्या जातील. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडेल. जिल्ह्यात ४१ हजार ४० जागा आहेत. - डॉ. गणपत मोरे, शिक्षण उपसंचालक

Web Title: Eleventh admission process will be on 10th marks only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.