मोबाईलच्या जमान्यातही लॅण्डलाईन, क्वाईनबॉक्सची ट्रिंग ट्रिंग वाजतेय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:21+5:302021-09-04T04:24:21+5:30
हजारांवर व्यक्तींकडे लॅण्डलाईन... प्रत्येकाच्या हाती मोबाईल आल्याने लॅण्डलाईचा वापर कमी झाला आहे. तरीही खाजगी, शासकीय कार्यालये, बसस्थानक, पोलीस स्टेशन, ...
हजारांवर व्यक्तींकडे लॅण्डलाईन...
प्रत्येकाच्या हाती मोबाईल आल्याने लॅण्डलाईचा वापर कमी झाला आहे. तरीही खाजगी, शासकीय कार्यालये, बसस्थानक, पोलीस स्टेशन, रेल्वेस्थानक, पोस्ट ऑफीस या ठिकाणी लॅण्डलाईनचा वापर आजही सुरुच आहे. विविध कॉलेजही याच फोनचा वापर करतात. जिल्ह्यात हजारांवर व्यक्तींकडे लॅण्डलाईन आहेत. नियमित वापर करणा-यांचीही संख्या लक्षणीय आहे.
जिल्ह्यात १ हजाराहून अधिक काॅईनबॉक्स...
जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातील अनेक वस्तीच्या ठिकाणी अद्यापही कॉईनबॉक्सचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. ज्यांच्याकडे मोबाईल नाही ते आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी कॉईनबॉक्सचा आधार घेत आहेत. पुर्वीच्या तुलनेत सध्या कॉइनबॉक्सच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.
कॉईनबॉक्स वापरणारे कोण...
कॉईनबॉक्स सेवा गेल्या १० ते १५ वर्षांपासून सुरु आहे. जसे मोबाईल येऊ लागले. तसे ग्राहकांचा प्रतिसाद कमी होत गेला. त्यामुळे कॉईनबॉक्सचा वापर कमी होत चालला आहे. दुकानावर अजुनही ज्यांच्याकडे मोबाईल नाही, ते कॉईनबॉक्स आहे, का अशी विचारणा करत असल्याचे कॉईनबॉक्स चालकांनी सांगितले.
म्हणून लॅण्डलाईन आवश्यकच...
सध्या प्रत्येकाकडे मोबाईल आला आहे. मात्र, कधी नेटवर्कचा अडथळा असतो. त्यावेळी फोन कसा करणार असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे घरी संपर्कासाठी लॅण्डलाईन गरजेचा आहे. अनेकांच्या घरी अजुनही याच फोनचा वापर केला जात आहे. - अण्णासाहेब महामुनी
बदलत्या तंत्रज्ञानामुळे मोाबईल अनेकाकंडे आहे. ज्येष्ठ नागरिकांना लॅण्डलाईन फोनबद्दल संपुर्ण माहिती असते. त्यामुळे लॅण्डलाईनचा वापर आजही सुरुच आहे. मोबाईलपेक्षा लॅण्डलाईनवर आवाजाची स्पष्टता अधिक आहे. - काकासाहेब ढोले