पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:36 AM2021-02-28T04:36:51+5:302021-02-28T04:36:51+5:30
लातूर : पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे गरजेचे आहे. पाण्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवस्थापन केले नाही तर आपल्याला भविष्यात ...
लातूर : पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे गरजेचे आहे. पाण्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवस्थापन केले नाही तर आपल्याला भविष्यात पाण्याची कोठारे निर्माण करावी लागतील असे प्रतिपादन बी. पी. सूर्यवंशी यांनी येथे केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, साक्षी समैया, संजय ममदापुरे, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डाॅ. संजय गवई यांची उपस्थिती होती. सूर्यवंशी म्हणाले,पाणी हे प्रत्येकाचे जीवन आहे कारण आपल्याला क्षणोक्षणी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व आपण जाणून घेऊन त्यासोबत सकारात्मक वर्तन करणे अत्यंत गरजेचे आहे. सूत्रसंचालन तहसीन मनियार यांनी तर आभार अर्जुन बंडगर यांनी मानले. स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ. रत्नाकर बेडगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्रीराम वाघमारे, डॉ. श्रीकांत गायकवाड यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी विकास काळे, उमेश गाडे, बालाजी शेंगसारे, चंदन टाळकुटे, ओम ढमाले, श्रीराम सिंघन यांनी परिश्रम घेतले.