माजी सैनिकाची डाेक्यात गाेळी झाडून आत्महत्या; लातुरातील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: July 24, 2023 07:52 PM2023-07-24T19:52:58+5:302023-07-24T19:53:19+5:30
एमआयडीसी पाेलिसांत नाें, माजी सैनिक सुशीलकुमार कावळे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गत दाेन दिवसांपासून किरकाेळ काैटुंबिक वाद सुरू हाेता.
राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील विक्रमनगर भागात भाड्याच्या घरात वास्तव्याला असलेल्या एका माजी सैनिकाने डाेक्यात पिस्टलमधून गाेळी झाडून आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. सुशीलकुमार वैजनाथ कावळे (वय ४५ रा. चिंचाेली बल्लाळनाथ, ता. लातूर) असे मयत माजी सैनिकाचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, माजी सैनिक सुशीलकुमार वैजनाथ कावळे हे लातुरातील विक्रमनगर भागात एका शाळेसमाेर भाड्याच्या घरात वास्तव्याला हाेते. दरम्यान, ते दाेन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले हाेते. त्यांना दाेन मुली असून, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी लातुरातील विक्रमनगर भागात राहण्याचा निर्णय घेतला हाेता. साेमवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास सुशीलकुमार कावळे यांनी स्वत:जवळ असलेल्या पिस्टलमधून डाेक्यात गाेळी झाडून आत्महत्या केली. यावेळी घरात पत्नी स्वयंपाक करत हाेती. मयत सुशीलकुमार कावळे यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुली, आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.
घटनास्थळी लातूर शहराचे उपविभागीय पाेलिस अधिकारी भागवत फुंदे, पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे, सहायक पाेलिस निरीक्षक माणिकराव डाेके, सहायक पाेलिस उपनिरीक्षक भागवत मुंळे, सचिन कांबळे, याेगेश चिंचाेलकर, याेगेश पिसदूरकर, अरविंद शिंगाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक माणिकराव डाेके करत आहेत.
किरकाेळ काैटुंबिक वादातून घडली घटना..?
माजी सैनिक सुशीलकुमार कावळे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गत दाेन दिवसांपासून किरकाेळ काैटुंबिक वाद सुरू हाेता. साेमवारी सकाळी मुली शाळेला गेल्यानंतर दाेघांत पुन्हा वाद झाला आणि सुशीलकुमार कावळे यांनी घरात असलेल्या पिस्टलने डाेक्यात गाेळी झाडून आत्महत्या केली. अशी माहिती सध्या समाेर आली आहे, असे एमआयडीसी ठाण्याचे पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे यांनी सांगितले.