विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या माजी सैनिकाला कारावास

By राजकुमार जोंधळे | Published: April 3, 2023 06:08 PM2023-04-03T18:08:13+5:302023-04-03T18:09:17+5:30

या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने १२ साक्षीदार तपासण्यात आले.

Ex-soldier jailed for abusing wife in Latur | विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या माजी सैनिकाला कारावास

विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या माजी सैनिकाला कारावास

googlenewsNext

लातूर : विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका माजी सैनिकाला सात वर्षांचा कारावास आणि एक लाखाचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.

पीडित विवाहिता ही तिच्या शेतात काम करण्यासाठी २ एप्रिल, २०१५ राेजी गेली हाेती. दरम्यान, आराेपी मल्लिकार्जुन माणिकअप्पा म्हेत्रे याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात पीडित विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गुन्ह्याचा तपास उत्तम हरिश्चंद्र जाधव यांच्याकडे देण्यात आला हाेता. त्यांनी या गुन्ह्याचा तपास करून, उदगीर येथील सत्र न्यायालयामध्ये कलम ३७६, ५०६ (२) भादंवि अन्वये दाेषाराेपपत्र दाखल केले हाेते. त्यानंतर, आराेपीने दाेष नाकारल्याने या खटल्याची सुनावणी उदगीर येथील सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांच्या न्यायालयात घेण्यात आली.

या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील पाच साक्षीदार फितूर झाले. पीडित विवाहितेने दिलेली साक्ष आणि इतर आनुषंगिक पुरावे ग्राह्य धरून उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी आराेपी मल्लिकार्जुन माणिकअप्पा म्हेत्रे याला पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी कलम ३७६ अन्वये दाेषी ठरवत सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठाेठावली. त्याचबराेबर, एक लाख रुपयांचा दंड आणि ताे दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. त्याचबराेबर, दंडाची संपूर्ण रक्कम ही पीडित विवाहित महिलेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात सहायक सरकारी वकील एस. एस. गिरवलकर यांनी पीडित विवाहितेची बाजू मांडली तर त्यांना न्यायालयीन पैरवीकार पाेलिस उपनिरीक्षक जी. पी. माेमीन यांनी सहकार्य केले.

 

Web Title: Ex-soldier jailed for abusing wife in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.