लातुरातील क्रीडा संकुलावर दंगाकाबू पथकाची रंगीत तालीम

By राजकुमार जोंधळे | Published: September 8, 2023 07:03 PM2023-09-08T19:03:56+5:302023-09-08T19:04:09+5:30

आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित दंगा काबू योजनेची रंगीत लातूर क्रीडा संकुलावर घेण्यात आला.

exercise by the riot control team at the sports complex in Latur | लातुरातील क्रीडा संकुलावर दंगाकाबू पथकाची रंगीत तालीम

लातुरातील क्रीडा संकुलावर दंगाकाबू पथकाची रंगीत तालीम

googlenewsNext

लातूर : आगामी श्री गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर शुक्रवारी दंगा काबू रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक अंकिता कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दंगा काबू योजनेत रंगीत तालीममध्ये पोलिस मुख्यालय, दंगा काबू पथक, शीघ्र कृती दल, लातूर शहरातील पाचही पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी असे एकूण 94 पोलीस अंमलदार आणि दहा पोलीस अधिकारी  हजर होते.

आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित दंगा काबू योजनेची रंगीत लातूर क्रीडा संकुलावर घेण्यात आला.  कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास पोलीस अवघ्या काही वेळेत घटनास्थळी दाखल होतील, तेथील परिस्थिती सुरळीतपणे हाताळण्याची पोलिसांची क्षमता तपासण्यात आली. शि

Web Title: exercise by the riot control team at the sports complex in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.