लातुरात ३८ कोटींचे अघोषित उत्पन्न उघड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:02 AM2017-08-12T04:02:53+5:302017-08-12T04:02:53+5:30

कंत्राटदार व मोठ्या सराफ व्यापारी प्रतिष्ठानांचे प्राप्तीकर विभागाकडून सलग तिसºया दिवशी सर्वेक्षण सुरू होते. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळपर्यंत ३८ कोटींचे अघोषित उत्पन्न उघडकीस आले असून, एकाच वेळी दहा ठिकाणी चौकशी होण्याची शहरातील पहिलीच वेळ आहे.

 Explanation of unaudited income of Rs. 38 crores in Latur | लातुरात ३८ कोटींचे अघोषित उत्पन्न उघड  

लातुरात ३८ कोटींचे अघोषित उत्पन्न उघड  

Next

लातूर : कंत्राटदार व मोठ्या सराफ व्यापारी प्रतिष्ठानांचे प्राप्तीकर विभागाकडून सलग तिसºया दिवशी सर्वेक्षण सुरू होते. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळपर्यंत ३८ कोटींचे अघोषित उत्पन्न उघडकीस आले असून, एकाच वेळी दहा ठिकाणी चौकशी होण्याची शहरातील पहिलीच वेळ आहे.
अधिकचे उत्पन्न असतानाही ते कमी दाखविल्याचा संशय ज्या व्यापारी प्रतिष्ठानांबाबत आला त्यांचे सर्वेक्षण तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यामध्ये आठ कंत्राटदार असून, ते सर्वजण मोठे शासकीय कंत्राट घेतात.
नियमाप्रमाणे त्यांना कर तसेच व्याज भरावे लागेल. औरंगाबाद येथील अतिरिक्त प्राप्तीकर आयुक्त संदीपकुमार साळुंके यांच्यासह नांदेड, बीड व लातूर येथील अधिकारी तीन दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून आहेत.

शहरातील दोन मोठे सराफ व्यापारी प्रतिष्ठानांच्या व्यवहाराबाबत
ही तपासणी झाली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३८ कोटींचे अघोषित उत्पन्न संबंधित कंत्राटदार व व्यापारी प्रतिष्ठानांनी मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title:  Explanation of unaudited income of Rs. 38 crores in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.