भरधाव पीकप वाहनाच्या धडकेत शेतकरी, बैल ठार; नांदेड-उदगीर महामार्गावरील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: May 25, 2024 01:17 PM2024-05-25T13:17:48+5:302024-05-25T13:18:28+5:30
राजकुमार जाेंधळे / जळकाेट / काेळनूर (जि. लातूर) : भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकऱ्यासह एक बैल ठार झाल्याची घटना शुक्रवारी ...
राजकुमार जाेंधळे / जळकाेट / काेळनूर (जि. लातूर) : भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकऱ्यासह एक बैल ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी नांदेड-उदगीर महामार्गावरील काेळनूर गावानजीक घडली. याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, मुखेड तालुक्यातील जांब (बु.) येथे शुक्रवारी बैलबाजार असतो. जळकाेट तालुक्यातील तिरुका येथील शेतकरी त्र्यंबक भाऊराव पाटील (वय ५५) हे बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघाले हाेते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास जळकोटकडून उदगीरकडे निघालेल्या पिकअप वाहनाने (एम.एच. २६ बी.ई. १८६२) महामार्गावरील कोळनूर येथे रस्त्याच्या बाजूने पायी निघालेल्या बैलजोडीसह शेतकऱ्याला उडवले. ही धडक एवढा भीषण होता की, यात एक बैल जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. धडकेत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचाही मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याबाबत जळकोट पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे