शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:20 AM2021-01-25T04:20:14+5:302021-01-25T04:20:14+5:30
लातूर :- राज्य शासनाच्या उत्पादक ते थेट ग्राहक विक्री बाबतच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेअंतर्गत श्री. संत शिरोमणी ...
लातूर :- राज्य शासनाच्या उत्पादक ते थेट ग्राहक विक्री बाबतच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेअंतर्गत श्री. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार या अभियानाची सुरुवात होत आहे. शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र सुरु होत आहे त्याचा प्रारंभ २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
उत्पादक शेतकऱ्यांची ताजी भाजी फळे फुले अन्नधान्य इत्यादी वाजवी दरात विक्री होण्याच्या दृष्टीने लातूर, उदगीर,अहमदपूर, औसा व निलंगा या शहरात शेतकरी /रयत बाजार अभियानाचा शेतकरी गट या व्यवस्थेव्दारे थेट ग्राहकापर्यंत जोडण्यासाठी तसेच उत्पादक शेतकऱ्यांना रोडच्या कडेला विक्री न करता शासनाच्या मदतीने तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून दिली जात आहे. या अभियानाअंतर्गत लातूर येथे रयत बाजाराचे उद्घाटन विवेकानंद चौक, नांदेड रोड, पाण्याच्या टाकी जवळ महानगरपालिकेच्या खुल्या जागेत २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. तरी इच्छुक फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादित शेतमाल थेट ग्राहकांना विक्री व्यवस्थापनाचे नियोजन करून देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन यावे. तसेच या परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, सदर विक्री केंद्रास भेट देऊन ताजा व स्वस्त भाजीपाला फळे-फुले, अन्नधान्य व इत्यादी वाजवी दरात खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा डी. एस. गावसाने यांनी केले आहे. सहभाग नोंदविण्यासाठी तसेच लातूर येथे विक्री व्यवस्थापनेसाठी प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयात विशाल जगताप मोबाईल नंबर ९०२८४७५०१७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.