निलंग्यात कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 06:21 PM2018-04-19T18:21:28+5:302018-04-19T18:21:28+5:30
निलंगा तालुक्यातील शेंद येथील एका शेतकऱ्याने कर्जास कंटाळून विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली.
निटूर (जि़ लातूर) : निलंगा तालुक्यातील शेंद येथील एका शेतकऱ्याने कर्जास कंटाळून विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली.
माधव नारायणराव भदरगे (६०, रा़ शेंद) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भदरगे यांना ६९ आर शेती आहे़ त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. दरम्यान, त्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते़ हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते़. बुधवारी रात्री ९ वा़ च्या सुमारास भदरगे यांनी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले़ मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, भदरगे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात माझी जमीन कमी असल्याने व घर प्रपंचाचा खर्च करण्यास असमर्थ असल्याने काही खाजगी व्यक्तींकडून कर्ज घेतले़ त्याच्या व्याजापोटी मुद्दलापेक्षा ज्यास्त पैसे दिले आहे, असे म्हटले आहे़
याप्रकरणी मयताचे भाऊ साधू भदरगे यांच्या फिर्यादीवरुन निटूर पोलीस चौकीत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे़