शेतकरी, शेतमजूर, कष्टकरीच मराठी भाषेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:21 AM2021-02-05T06:21:53+5:302021-02-05T06:21:53+5:30

जळकाेट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘भाषा संवर्धन पंधरवडा समारोप’प्रसंगी ते बोलत होते. १४ ते २८ ...

Farmers, agricultural laborers, hardly the basis of Marathi language | शेतकरी, शेतमजूर, कष्टकरीच मराठी भाषेचा आधार

शेतकरी, शेतमजूर, कष्टकरीच मराठी भाषेचा आधार

Next

जळकाेट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘भाषा संवर्धन पंधरवडा समारोप’प्रसंगी ते बोलत होते. १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी विभागाच्या वतीने भाषा पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. परळी वैजनाथ येथील लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयातील डॉ. राजकुमार यल्लावाड, प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने, सुप्रसिद्ध कवी बालाजी कांबळे, भगवान लहाने, लक्ष्मणराव तिडके यांची उपस्थिती होती. डॉ. यल्लावाड म्हणाले, महाराष्ट्र राज्यात कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर असेपर्यंत आमची मातृभाषा कायम राहणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जे. एल. जायेवार, प्रा.डॉ. जे.पी. शेळके, प्रा.डॉ. नामदेव राठोड, प्रा.डॉ. बालाजी राठोड, प्रा.डॉ. एन.पी. कुडकेकर, प्रा.डॉ. माधव कांबळे, प्रा.डॉ. टी. ई. केंद्रे, प्रा.डॉ. ए.जी. जोशी, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. एस. एन. मोरे, प्रा. डॉ. व्ही. टी. कल्लूरकर, डॉ. डी.एस. टिमकीकर, प्रा. एन.पी. मुसळे, प्रा.डॉ. अशाेक मुंडे, प्रा.डॉ. डी.टी. घटकार, प्रा. एस.डी. मुंडे, प्रा. संताेष दापकेकर, डॉ आर.जी. बिरादार, प्रा. व्ही. के. नारायण, प्रा. बी. एस. वडजे, प्रा. ए.व्ही. बचुटे, प्रा. एस.यू. कोरे, डॉ. ए.बी. सोमवंशी, डॉ. ए.एस. मुंढे, प्रा. एस.एन. मोरे, प्रा. एस. नप्ते आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. रामचंद्र पस्तापुरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. एन.पी. कुडकेकर यांनी, तर आभार सहा. प्रा. पी. एस. कांबळे यांनी मानले.

Web Title: Farmers, agricultural laborers, hardly the basis of Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.