जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी योजनांसाठी अर्ज करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:21 AM2021-07-31T04:21:37+5:302021-07-31T04:21:37+5:30

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी नजीकच्या सामुदायिक सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र ग्रामपंचायत कार्यालयातून ...

Farmers in the district should apply for agricultural schemes | जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी योजनांसाठी अर्ज करावेत

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी योजनांसाठी अर्ज करावेत

Next

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी नजीकच्या सामुदायिक सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र ग्रामपंचायत कार्यालयातून अर्ज करावेत. या योजनेत अंतर्भूत घटक नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्यांचे प्लॉस्टिक अस्तरीकरण, तसेच इतर बाबीमध्ये वीजजोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, ठिबक सिंचन, तुषार सिंचन संच परसबाग, पंपसंच (डिझेल/विद्युत) पीव्हीसी पाईप अशा विविध गरज असलेल्या बाबी निवडून अर्ज करावेत.

अर्ज करताना सातबारा आठ -अ, पासबुक, आधारकार्ड आणि मोबाईलसह उपस्थित राहून अर्ज करावेत. अर्ज केल्यानंतर शासनाच्या पोर्टलवरून लॉटरीत आपली निवड झाल्यानंतर आपणास कागदपत्रे दिलेल्या मुदतीत अपलोड करावी लागतील. लाभार्थ्यांच्या अटी आणि शर्तीत उत्पन्न १ लाख ५० हजार कमीत कमी क्षेत्र ०-४ हेक्टर आणि जास्तीतजास्त ६ हेक्टरची मर्यादा, जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर बाबींसाठी कमीत कमी ०.२० हेक्टर क्षेत्र असावे. तरी अशा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती गोविंद चिलकूर व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष जोशी, कृषी विकास अधिकारी एस. आर. चोले यांनी केले आहे.

Web Title: Farmers in the district should apply for agricultural schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.