गारपीट अनुदानासाठी शेतकऱ्यांचे बँकेकडे खेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:09+5:302021-02-18T04:35:09+5:30
गारपीट अनुदानासाठी औसा तालुक्यातील बेलकुंड येथील अनेक शेतकऱ्यांनी आशिव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व बेलकुंड येथील महाराष्ट्र ग्रामीण ...
गारपीट अनुदानासाठी औसा तालुक्यातील बेलकुंड येथील अनेक शेतकऱ्यांनी आशिव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व बेलकुंड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खाते नंबर दिले होते.
ज्या शेतकऱ्यांनी आशिव येथील मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते नंबर दिले होते. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. मात्र बेलकुंड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व आशिव येथील मध्यवर्ती बँकेचे खाते नंबर दिलेल्या बेलकुंड येथील २५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे दोन महिने उलटूनही अद्याप पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांना अनुदानासाठी बँकेत खेटे मारावे लागत आहेत. हे अनुदान लवकरात लवकर जमा करावे असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनावर सरपंच विष्णू कोळी यांच्यासह शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.