पिकविमासाठी भादा येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

By संदीप शिंदे | Published: August 16, 2023 07:53 PM2023-08-16T19:53:51+5:302023-08-16T19:54:05+5:30

मागील वर्षीपासून भादा येथील शेतकरी पिकविम्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत.

Farmers on hunger strike at Bhada for crop insurance | पिकविमासाठी भादा येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

पिकविमासाठी भादा येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

googlenewsNext

भादा : खरीप हंगाम २०२२ मधील पिकविमा देण्यात यावा यासाठी पिकविमा कंपनीच्या निषेधार्थ मंगळवारी शेतकऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांची भेट घेत पिकविमा मंजूर झालेला असल्याचे सांगितले.

मागील वर्षीपासून भादा येथील शेतकरी पिकविम्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. यापुर्वी पिकविमा कंपनी, शेतकरी आणि जिल्हाधिकारी यांची बैठकही पार पडली होती. मात्र, भादा येथील शेतकरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम राहीले. स्वातंत्र्यदिनी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यामुळे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून भादा महसूल मंडळाला पिकविमा मंजूर झाला असल्याचे जाहीर केले. आंदोलनाच्या ठिकाणी भादा पोलीसाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Farmers on hunger strike at Bhada for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.