शेतकऱ्यांनी जागृती शुगर्सच्या ऊस विकास योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:29+5:302021-01-24T04:09:29+5:30

जागृती शुगर्सच्या वतीने ऊस विकास योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचा कारखान्याच्या लाभ क्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस उत्पादकांना लाभ ...

Farmers should take advantage of Jagruti Sugars' sugarcane development scheme | शेतकऱ्यांनी जागृती शुगर्सच्या ऊस विकास योजनेचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी जागृती शुगर्सच्या ऊस विकास योजनेचा लाभ घ्यावा

Next

जागृती शुगर्सच्या वतीने ऊस विकास योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचा कारखान्याच्या लाभ क्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस उत्पादकांना लाभ व्हावा म्हणून जागृती शुगर्सच्या वतीने ऊस विकास योजना सुरू करण्यात आली आहे. शनिवारी येथे मेळावा घेण्यात आला. यावेळी लक्कड जवळगा येथे माजी आ. टी.पी. कांबळे, शिवाजी पेठे, शिरूर अनंतपाळ येथे शेषराव पाटील, सुधीर दुरूगकर, शिवाजी उडदे, व्यंकट बेंबळगे, दैठणा येथे तंटामुक्ती अध्यक्ष सदविवेक मिरकले, विश्वनाथ तोटे, रमेश मुळे, अण्णाराव पाटील, सीताराम पाटील, कुमार बिरादार, सुशेन बिरादार, शेतकी अधिकारी आर.के. कदम, ए.आर. कदम, प्रशांत कदम, ए.सी. सुरवसे, सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

रोप लागवडीचा फायदा...

तालुक्यातील शेतकऱ्यांनी जागृती शुगर्सने तयार केलेल्या रोपांची लागवड केली आहे. त्या शेतकऱ्यांच्या ऊस लागवडीची नोंदणी महिनाभरापूर्वीची म्हणजे रोपे तयार करण्यात आलेल्या तारखेची होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रोपे लागवडीचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी रोपांची लागवड करावी, असे आवाहनही सुनीलकुमार देशमुख यांनी केले. तालुक्यातील शिरूर अनंतपाळ, दैठणा, शेंद, तळेगाव, लक्कड जवळगा, जोगाळा, साकोळ, धामणगाव, होनमाळ, अजनी येथे मेळावा घेण्यात आला.

Web Title: Farmers should take advantage of Jagruti Sugars' sugarcane development scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.