मुलाची नोकरी गेल्याने पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2017 07:07 PM2017-01-08T19:07:38+5:302017-01-08T19:09:53+5:30

नोकरीसाठी १८ लाख रुपये देऊनही वर्षभरातच मुलाची नोकरी गेल्यामुळे पित्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना झरी (बु़) येथे घडली.

Father's Suicide Following a Child's Job | मुलाची नोकरी गेल्याने पित्याची आत्महत्या

मुलाची नोकरी गेल्याने पित्याची आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 8  : नोकरीसाठी १८ लाख रुपये देऊनही वर्षभरातच मुलाची नोकरी गेल्यामुळे पित्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना झरी (बु़) येथे घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़. मात्र, शनिवारी मयत सुधाकर खंदारे यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संस्थाचालकासह चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला़ आहे. 

चाकूर तालुक्यातील झरी (बु़) येथील शेतकरी सुधाकर सखाराम खंदारे यांच्या मुलास शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संजय दिगंबर आलापुरे, कमलाकर नारायण जायभाये, मिराबाई कमलाकर जायेभाये (रा़ अहमदपूर) तसेच संभाजी मूकनर पाटील (रा़ मुखेड) आणि तनिष्क कांबळे (रा़ लातूर) यांनी खंदारे यांच्याकडून नोकरीसाठी १८ लाख रुपये उकळले होते. विशेष म्हणजे शेती विकून तसेच पाहूण्याकडून उसनवारी करून १८ लाख रुपये या चौघांच्या स्वाधीन केले़ त्यानंतर संस्थाचालक तनिष्क कांबळे यांच्या मुंबई येथील शाळेवर विनायक सुधाकर खंदारे यास शिक्षकाची नोकरी देण्यात आली़ नोकरी सुरु होवून तब्बल १ वर्षाचा कालावधी उलटला. तरी पगाराचा पत्ता नसल्याने खंदारे यांनी पगारासाठी विचारणा केली असता संस्थाचालकाने मुलाला तडकाफडकी नोकरीवरून काढले. १ वर्ष विनावेतन नोकरी केली़,  नोकरीसाठी १८ लाख रुपये मोजूनही पदरात काहीच पडले नाही़.

दरम्यान, नोकरीसाठी दिलेले १८ लाख रुपये संस्थाचालकाकडे परत मागितले असता त्यांना धनादेश देण्यात आला़ परंतु, खात्यात पैसे नसल्यामुळे धनादेश वटला नाही. तेव्हा खंदारे यांनी या चौघांकडेही पैशासंबंधी विचारणा केली असता चेक परत द्या, पैसे रोख घ्या असे सांगण्यात आले़ त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुधाकर खंदारे यांनी संस्थाचालकाकडे धनादेश परत केला. परंतू आज उद्या म्हणत जवळपास १ वर्ष चालढकल करण्यात आली़ परंतू, नोकरीच्या नावावर या चौकडीने आपला विश्वासघात व फसवणूक केल्याचा धक्का सुधाकर सखाराम खंदारे यांना बसला़ त्यातून त्यांनी २८ डिसेंबर २०१६ रोजी झरी (बु़) येथील राहत्या घरी गळपास घेवून आत्महत्या केली़

या संबंधी आकस्मित मृत्यू १७४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ शनिवारी मयताचा मुलगा विनायक सुधाकर खंदारे यांनी चाकूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार कलम संजय दिगंबर आलापुरे, संभाजी मूकनर पाटील, कमलाकर नारायण जायभाये, मिराबाई कमलाकर जायेभाये व संस्थाचालक तनिष्क कांबळे यांच्यावर कलम ४२०, ४६७, ४७१, ३०६, ३४ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश बंकवाड, पोकॉ़ अर्जून तिडोळे हे करीत आहेत़

Web Title: Father's Suicide Following a Child's Job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.