धाकधूक वाढली! पोल्ट्रीफार्ममध्ये ४,२०० पिल्लांचा मृत्य, लातूर जिल्ह्यातील घटना
By संदीप शिंदे | Updated: January 23, 2025 11:03 IST2025-01-23T11:02:36+5:302025-01-23T11:03:12+5:30
अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील पोल्ट्रीफॉर्मध्ये ४२०० पिल्ले मृतावस्थेत

धाकधूक वाढली! पोल्ट्रीफार्ममध्ये ४,२०० पिल्लांचा मृत्य, लातूर जिल्ह्यातील घटना
लातूर : अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील एका पोल्ट्रीमध्ये जवळपास ४२०० ब्रॉयलर पिल्ले मृतावस्थेत आढळून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी औंध (पुणे) येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जावून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी दिली आहे. मागील काही दिवसांत उदगीर येथे ६४ कावळ्यांचा बर्डफ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ढाळेगाव येथील घटना समोर आल्याने पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे. पुणे येथील प्रयोगशाळेचा काय अहवाल येतो याकडे लक्ष लागले आहे.