पंधरा दिवसांनंतर रुग्णसंख्या हजारावर; लातूरकरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:59+5:302021-04-27T04:19:59+5:30
चार दिवसांतील बाधित आणि कोरोनामुक्त तारीख बाधित कोरोनामुक्त ...
चार दिवसांतील बाधित आणि कोरोनामुक्त
तारीख बाधित कोरोनामुक्त
२३ एप्रिल १४७८ १७७५
२४ एप्रिल १४०० १७०४
२५ एप्रिल १५२२ १६४४
२६ एप्रिल १०६९
दुसऱ्या लाटेतील दोन महिन्यात ४० हजार ११० रुग्ण
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लातूर जिल्ह्यात प्रचंड रुग्णसंख्या वाढली. पहिल्या लाटेतील एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या अकरा महिन्यांत जिल्ह्यात फक्त २५ हजार ३९६ रुग्ण आढळले होते. मात्र, दुसऱ्या लाटेचा कहर झाला. १ मार्च २०२१ ते २५ एप्रिल २०२१ या दोन महिन्यांत तब्बल ४० हजार ११० रुग्ण आढळले आहेत. त्यातच २६ एप्रिल रोजी दररोजच्या रुग्णसंख्येपेक्षा आकडा कमी आल्याने शिवाय कोरोनामुक्त दररोज जास्त होत असल्याने लातूरकरांना किंचितसा दिलासा मिळाला आहे.