शाॅर्टसर्किटने लागली आग..? लातुरात सात ट्रॅव्हल्सचा झाला ‘काेळसा’

By राजकुमार जोंधळे | Published: March 25, 2023 08:02 AM2023-03-25T08:02:36+5:302023-03-25T08:04:35+5:30

२ काेटींचे नुकसान; दुरुस्तीला आलेली वाहने खाक

fire started due to short circuit seven travels bus fire in latur | शाॅर्टसर्किटने लागली आग..? लातुरात सात ट्रॅव्हल्सचा झाला ‘काेळसा’

शाॅर्टसर्किटने लागली आग..? लातुरात सात ट्रॅव्हल्सचा झाला ‘काेळसा’

googlenewsNext

राजकुमार जाेंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर: रिंगराेड परिसरा सिकंदरपूर चाैकात एका गॅरेजवर हायपाॅवरची विद्युत तार तुटून पडल्याने झालेल्या शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी समाेर आली. या आगीत दुरुस्ती अन् रंगरंगाेटीसाठी आलेल्या सात ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी केवळ वाहनांचे सांगाडेच आढळून आले. ही घटना शुक्रवारी पहाटे २ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, यामध्ये दाेन काेटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

लातुरातील कव्हा नाका-बाभळगाव नाकादरम्यान सिकंदरपूर चाैक परिसरात एका गॅरेजवर ट्रॅव्हल्स दुरुस्तीसाठी आणण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हायपाॅवरची विद्युत तार तुटल्याने शाॅर्टसर्किट झाल्याची माहिती समाेर आली आहे. यातून खाली उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सवर आगीच्या ठिणग्या पडल्या अन् आगीचा भडका उडाला. काही क्षणात आगीने राैद्ररूप धारण केले. यामध्ये उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या आहेत. याबाबत विवेकानंद चाैक ठाण्यात नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

घटनास्थळी धावले पाेलिस, अग्निशामक दल...

घटनेची माहिती मिळताच चार अग्निशामक दलाचे जवान, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी अंकिता कणसे, विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर हे पथकासह धावले. काही तासाच्या प्रयत्नानंतर आग आटाेक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, ताेपर्यंत ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या. यात काेट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

पहाटे तार तुटली अन् उडाला आगीचा भडका..?

लातुरातील वेगवेगळ्या वाहनमालकांनी या ट्रॅव्हल्स दुरुस्तीसाठी, डेटिंगसाठी, पेंटिंगसाठी आणल्या हाेत्या. त्या गॅरेजलगतच्या माेकळ्या जागेत थांबविलेल्या हाेत्या. दरम्यान, शुक्रवारी २ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास हायपाॅवरची विद्युत तार तुटली आणि खाली पडली. यावेळी शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. असे सांगितले जात आहे. मात्र, ठाेस कारणांचा शाेध घेतला जात आहे.

घटनास्थळी उरले ट्रॅव्हल्सचे सांगाडे...

रिंगराेड परिसरात दिवस-रात्र माेठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, ही घटना रात्रीच्यावेळी घडल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. विद्युत तार कशी तुटली? याचे कारण समाेर आले नाही. काही क्षणातच शाॅर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सात वाहने खाक झाली असून, घटनास्थळी वाहनांचे सांगाडे अन् तुटलेली विद्युत तार दिसून आली.

महावितरणकडूनही घटनेची चाैकशी सुरु...

आगीची माहिती विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांना मिळाली. शिवाय, महावितरणही या घटनेची चाैकशी करत आहे. याबाबत पाेलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, याबाबत अद्यापही पाेलिसामध्ये नाेंद नाही. ही घटना नेकमी कशामुळे घडली, नेमके कारण काय? याचा शाेध पाेलिस, महावितरण आणि वाहन मालकांकडून घेतला जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: fire started due to short circuit seven travels bus fire in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर