एसटीतील प्रथमोपचार पेट्या झाल्या गायब
By Admin | Published: June 6, 2014 12:35 AM2014-06-06T00:35:23+5:302014-06-06T01:04:22+5:30
रविंद्र भताने, चापोली सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एस टी बस सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच बनली आहे़ मात्र राज्य परिवहन
रविंद्र भताने, चापोली
सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एस टी बस सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच बनली आहे़ मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार्या अनेक एस टी बस मधील प्रथमोपचार पेट्याच गायब झाल्या आहेत़ तसेच ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेट्या आहेत त्यामधील औषधे गायब आहेत़
जनसामान्यांसाठी गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस टी या प्रमाणे परिवहन महामंडळाच्या एस टी चा प्रवास अविरत सुरू आहे़ सर्व सामान्य प्रवासाचे साधन एस टी बस़ प्रवासासाठी गावागावातील प्रवाशांची आजही एस टी बस वर अवलंबून आहेत़ एस टी बसला खाजगी वाहनांची समांतर यंत्रणा उभी राहत असली तरीही एस टी सारखा आरामदायी प्रवास नसल्याने अनेक प्रवाशांचा आजही एस टी कडे ओढा आहे़ एस टी प्रवास सर्वात सुखकर त्यामुळे कितीही दुरवरचा प्रवास असेल तर प्रवाशी एस टीला पसंती देतात़
एस टी बसला जर अपघात झाला तर अपघाताच्या वेळी तातडीने प्रथमोपचार करता यावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आली आहे़ अपघात ठिकाणापासून दवाखाना दूर असला तरी तिथेच प्रथमोपचार केल्यावर प्रवाशाचा जीव वाचु शकतो़ मात्र एस टी मधील प्रथमोचार पेटीकडे चालक , वाहक किंवा आगारातील कर्मचारी कुणीही लक्ष देत नसल्याचे प्रथमोपचार पेटीला प्राथमिक उपचाराची गरज आहे़ काही एस टी बसची पाहणी केली असता बहुतांश बसमधील प्रथमोपचार पेटीच गायब असल्याचे आढळून आले आहे़